Uttarakhand flood Video Saam Tv
देश विदेश

Uttarakhand Video: उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार! सुखी नदीला पूर, शेकडो वाहनं पाण्यात; पाहा व्हिडिओ

Uttarakhand Rain News: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. अनेक ठिकाणी नदीला पूर आल्याचं चित्र येथे पाहायला मिळत आहे. यातच येथील एका नदीला पूर आल्याने त्यात अनेक वाहनं वाहून जाताना दिसत आहे. यांचा व्हिडिओही समोर आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. येथील चमोलीत गेल्या 24 तासात सर्वाधिक 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम चारधाम यात्रेवरही दिसून येत आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. चमोली येथे पावसामुळे पोखरी कर्णप्रयाग मोटार रस्ता विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. यातच हरिद्वारमध्ये सुखी नदीला पूर आल्याने त्यात अनेक वाहनं अक्षरशः खेळण्यासारखी वाहून जाताना दिसत आहे.

उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील लोक उष्णतेने त्रस्त होते. आता येथे पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.

चमोलीत गेल्या 24 तासात सर्वाधिक 72 मिमी पाऊस झाला आहे, तर हरिद्वारमध्ये 58 मिमी, हल्द्वानीमध्ये 56, पिथौरागढच्या बांगापानीमध्ये 69 मिमी, विकासनगरमध्ये 67 मिमी, कपकोटमध्ये 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातच हवामान खात्याने नैनितालमध्ये पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैनिताल आणि डेहराडून या दोन जिल्ह्यांसाठी आज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यात वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अशातच आता लोकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयएमडीच्या अहवालानुसार डेहराडूनमध्ये चार दिवस आणि नैनितालमध्ये पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT