Uttarakhand Transformer Explosion ANI
देश विदेश

Uttarakhand Transformer Explosion: उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू; ७ जखमी

Uttarakhand Latest News: या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे.

Priya More

Uttarakhand Police: उत्तराखंडमध्ये मोठी घटना घडली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या घटनेमध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ होमगार्डचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वीज प्रकल्पात बांधण्यात आलेल्या पुलाला विजेचा धक्का लागल्याने हा अपघात झाला. आधी जल निगमच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर इतरांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा देखील मृत्यू झाला.

उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी सांगितले की, 'पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, रेलिंगवर करंट होता. तपासात पुढील तपशील समोर येतील.'

संततधार पावसामुळे गंगा, यमुनेसह उत्तराखंड राज्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे गंगेची उपनदी अलकनंदा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पौरी जिल्ह्यातील श्रीनगर येथील GVK जलविद्युत प्रकल्पाच्या धरणातून सुमारे 3000 क्युमेक अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT