उत्तराखंडमध्ये सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्यातील 10 IAS आणि 20 PCS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आहेत. या फेरबदलात अनेक जिल्ह्यांच्या मुख्य विकास अधिकारी, अपर जिल्हाधिकरी नगर पालिकेच्या आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच पर्यटन, पंचायत समिती, शहरी विकास आणि कुंभमेळा प्रशासनांशी संबधित विभागांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अपर सचिव निधी यादव यांना पंचायत समिती संचालकपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहेत. त्या कृषी आणि कृषक कल्याण विभागाच्या अपर सचिवपदी कायम राहणार आहेत.
देहरादूनचे मुख्य विकास अधिकारी (CDO) म्हणून कार्यरत असलेले IAS अधिकारी अभिनव शाह यांची पर्यटन विभागाचे अपर सचिव आणि पर्यटन विकास परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी (अपर CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिथौरागडचे CDO दीपक सैनी यांच्याकडे देहरादूनच्या नव्या CDO पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहरी विकास संचालनालय, देहरादून येथे अपर संचालकपदी कार्यरत असलेले प्रवीण कुमार यांची पिथौरागडचे नवे CDO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बदल्यांच्या यादीमध्ये नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनामिका यांची अल्मोडाच्या मुख्य विकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उधमसिंह नगरच्या माजी संयुक्त दंडाधिकारी आशिमा गोयल यांच्याकडे हल्द्वानी महानगरपालिकेच्या नगर आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रुडकी येथे संयुक्त दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले दीपक रामचंद्र सेठ यांची चमोलीच्या CDO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर देहरादूनचे माजी संयुक्त दंडाधिकारी राहुल आनंद यांची उत्तरकाशीचे नवे मुख्य विकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रशासकीय फेरबदलात संयुक्त दंडाधिकाऱ्यांच्या पदांवरही बदल करण्यात आले आहेत. पौडी येथे संयुक्त दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या IAS अधिकारी गौरी प्रभात यांची रुडकी येथे याच पदावर बदली करण्यात आली आहे. तर रानीखेतच्या माजी संयुक्त दंडाधिकारी दीक्षिता जोशी यांची काशीपूरच्या नव्या संयुक्त दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.