Accident News  Saam TV
देश विदेश

Accident News : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या कारला भीषण अपघात, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर

Former CM Harish Rawat News : हरीश रावत यांच्यावर सध्या काशिपूरच्या केवीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आहेत.

प्रविण वाकचौरे

Uttarakhand News :

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरीश रावत यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. ओव्हरटेक करत असताना त्यांचा कार डिव्हायडरला धडकली. हल्दवानी वरून काशीपूरकडे जात असताना बुधवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास ही घटना घडली.

हरीश रावत यांच्यावर सध्या काशिपूरच्या केवीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आहेत. रावत यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाहनातील चालक आणि गनर देखील थोडक्यात बचावले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माजी मुख्यमंत्री हरीश रावत हल्दवानीहून काशीपूरला त्यांच्या फॉर्च्युन कारने जात होते. मात्र प्रवासादरम्यान त्यांची कार दुभाजकाला धडकली. गाडी वेगात असल्याने कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने रावत यांना सीएचसीमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून दुसऱ्या रुग्णालयात त्यांना पाठवलं.  (Live Marathi News)

सीओ भूपेंद्र सिंह भंडारी यांनी माजी मुख्यमंत्री रावत यांना त्यांच्या कारमधून काशीपूर येथील केव्हीआर रुग्णालयात नेले. उपचारानंतर माजी मुख्यमंत्री रावत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT