BJP strategy for Uttar Pradesh Assembly elections saam tv
देश विदेश

BJP : एकीकडं आघाडीची चर्चा, दुसरीकडं भाजपनं टाकला मोठा डाव; विधानसभा निवडणुकीसाठी प्लान ठरला

BJP strategy for Uttar Pradesh Assembly elections : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ साठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. राज्यातील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघांत महिला विस्तारक नियुक्त करण्याची तयारी केली आहे.

Namdeo Kumbhar

UP Assembly Election : देशातील सर्वात मोठ्या राज्यात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. सत्ताधारी भाजपकडून विधानसभेच्या ४०३ जागांसाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. या सर्व जागांवर भाजपकडून महिला विस्तारक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी इतर राज्यातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश असेल, असे समजतेय. या मोहिमेचे नेतृत्व भाजप महिला मोर्चा करेल. महिला प्रचारक गावोगावी आणि शहरांमध्ये प्रवास करून महिलांशी थेट संपर्क साधतील आणि त्यांना महिला सुरक्षा व सक्षमीकरणाशी संबंधित सरकारी योजना आणि कामांची माहिती देतील.

उज्ज्वला योजना, घरकुल योजना, मोफत रेशन आणि आयुष्मान यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांशी थेट संवाद साधणे, तसेच महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाचे मुद्दे मांडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या रणनीतीला अंतिम रूप देण्यासाठी लखनौमध्ये भाजपची महत्त्वाची कार्यशाळाही होणार आहे. पुढील काही दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यात भाजपने महिला मतांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत. आता उत्तर प्रदेशसाठीही भाजपकडून महिलांवर विश्वास दाखवला जात आहे.

भाजप लखनौमध्ये मोठी कार्यशाळा आयोजित करणार

महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती निश्चित करण्यासाठी शुक्रवारी लखनौमध्ये भाजपची कार्यशाळा आयोजित केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, राज्य प्रभारी विनोद तावडे आणि सह-प्रभारी व खासदार मेधा कुलकर्णी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत महिला प्रचारकांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचणे हे भाजपचे ध्येय आहे.

४०३ जागांवर महिला विस्तारक

उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ विधानसभा जागा आहेत. भाजप या सर्व जागांवर महिला विस्तारक पाठवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये इतर राज्यांतील महिला कार्यकर्त्यांचा समावेश असेल. स्थानिक पातळीवर महिलांना भेटणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि सरकारी योजनांविषयी माहिती देणे हे त्यांचे काम असेल. महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वावलंबन या उद्देशाने असलेल्या योजनांवर या विस्तारक महिल चर्चा करतील. यामुळे महिलांशी थेट संवाद साधता येईल, असा पक्षाचा विश्वास आहे.

भाजपकडून फक्त महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लान आखला जात नाही, तर संघटनेत महिलांचा सहभाग वाढवण्यावर चर्चा सुरू आहे. संघटनात्मक विस्तार कार्यक्रमांतर्गत नियुक्त होणाऱ्या विस्तारवाद्यांपैकी सुमारे ५०% महिला असू शकतात. या धोरणाद्वारे, संघटनेत महिलांना अधिक जबाबदारी देणे आणि तळागाळातील त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे.. महिला कार्यकर्त्यांनी इतर महिलांशी थेट संपर्क साधावा आणि त्यांच्याशी सरकारच्या कामाबद्दल संवाद साधावा, हे सुनिश्चित करण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे.

भाजप आणि सपामध्ये लढत

आगामी वर्षातील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेसदेखील राज्यात आपला राजकीय पाया विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. पण दुसरीकडे भाजपने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आधीच रणनीती आखत आहे. राज्यातील एकूण मतदारांपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे या मतांना आकर्षिक करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका; सलग तिसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील अतिक्रमण हटवलं

PM Narendra Modi : शेतीमध्ये गुंतवणूक करा, पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

World Largest Relegion: 2035 पर्यंत इस्लाम ठरू शकतो जगातील सर्वात मोठा धर्म; अमेरिकी थिंक टँकचा अंदाज

Nashik Picnic : थंडीच्या दिवसांत कुटुंबासोबत फिरण्यासाठी नाशिकमधील ५ सुंदर ठिकाणे, कमी बजेटमध्ये प्लान होईल ट्रिप

Maharashtra : शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो; ठाकरेसेना संतप्त

SCROLL FOR NEXT