uttar pradesh  saam tv
देश विदेश

Jai Shree Ram Written in Exam : उत्तरपत्रिकेत 'जय श्रीराम' लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

Jai shree Ram Written in Exam at uttar pradesh : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विश्वविद्यालयातून अजब प्रकरण समोर आलं आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तराच्या जागी 'जय श्रीराम' लिहिलं.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील पूर्वांचल विश्वविद्यालयातून अजब प्रकरण समोर आलं आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्याने परीक्षेतील एका पेपरमध्ये उत्तराच्या जागी 'जय श्रीराम' लिहिलं. तसेच क्रिकेटपटूंची नावे लिहिली. तरीही हा विद्यार्थी या पेपरमध्ये ५६ टक्के गुण मिळवून पास झाला.

माहिती अधिकाराच्या अंतर्गत ही बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण थेट राजभवनापर्यंत पोहोचले. या घटनेनंतर राजभवनात ८० उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यात अनेक जणांना अधिक गुण दिल्याचे समोर आले आहे.

या उत्तरपत्रिकांचं पुन्हा मूल्यांकन करण्यात आलं, त्यावेळी बाहेरील परीक्षकांनी जास्तीचे गुण दिल्याचे समोर आले. या प्रकरणी चौकशी समितीने उत्तरपत्रिका तपासणारे दोन शिक्षकांना गुणांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोषी मानत त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

या विद्यालयात ३ ऑगस्ट २०२३ रोजी एका विद्यार्थ्याने डी-फार्माच्या पहिल्या सेमेस्टरची परीक्षा झाल्यानंतर १८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. तसेच माहिती अधिकारातंर्गत उत्तरपत्रिकेची मागणी केली होती. त्यानंतर या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या. या परीक्षेत एका विद्यार्थ्याने एका प्रश्नांची उत्तर लिहिताना 'जय श्रीराम' लिहिलं. तरीही हा विद्यार्थी पास झाला. तसेच उत्तरामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आदी खेळाडूंची नावे लिहिले होते, हे उघड झाले.

उत्तरपत्रिकेत पश्नांची उत्तर लिहिताना जय श्रीराम आणि क्रिकेट खेळाडू लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी ७५ गुणांच्या पेपरमध्ये ४२ गुण दिले. एकंदरित त्याला या पेपरला एकूण ५६ टक्के गुण दिले. तर काही इतर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे उत्तीर्ण केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT