UP CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi amid BJP’s major organizational overhaul ahead of 2027 elections saam tv
देश विदेश

भाजपचा विधानसभेसाठी मास्टरप्लॅन! राज्यपातळीवर पक्षात मोठे बदल; कोणाची कुठे नियुक्ती?

Bjp Masterplan Up Assembly Election 2027 Organizational Changes: उत्तर प्रदेशातील 2027 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठे संघटनात्मक बदल करत नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बैठकीत निवडणूक रणनीती, बूथ पातळीवरील तयारी आणि सामाजिक समीकरणांवर सविस्तर चर्चा झाली.

Omkar Sonawane

2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच संघटनात्मक बदलांना सुरुवात केली आहे. पक्षाने विभाग प्रमुख आणि नवीन कार्यकरणी जाहीर केली असून उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक रणनीती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील सातत्याने दिल्ली दौऱ्यावर जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची आणि गृहमंत्री अमित शाह यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींसोबत एक तासाहून अधिक झालेल्या बैठकीत राज्यातील विकासकामे, संघटनेचा विस्तार, बूथपातळीवरची तयारी आणि आगामी निवडणूक कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली. 2027 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

भाजपने केलेल्या या मोठ्या बदलांकडे पक्षांतर्गत समाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 2027 च्या निवडणुकीची तयारी अधिक जोमाने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंकज चौधरी हे अनुभवी आणि तळागळातील नेते मानले जातात. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून पूर्वांचल, अवध आणि मध्य युपीमधील कुर्मी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ते सात वेळा खासदार राहिले असून सध्या राज्यमंत्री म्हणून कार्यभार ही त्यांच्याकडे आहे. धर्मपाल सिंह यांची संघ पार्श्वभूमी असून त्यांना संघटनेत महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते नेहमीच मिडिया, सोशल मीडिया आणि गटबाजीपासून दूर राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. सुनील बंसल हे दिल्लीत गेल्यानंतर त्यांची संघटन महामंत्री म्हणून नियुक्ती झाली होती.

गीता शाक्य यांची ब्रज येथे विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या मौर्य-शाक्य-सेनी समाजातून येतात. जो युपीमधील गैर यादव ओबीसी घटकांपैकी एक आहे. ब्रज या भागातील आग्रा, मथुरा, फिरोजाबाद, एटा, मैनपुरी, कासगंज, हाथरस आणि अलीगड या जिल्ह्यांमध्ये या समाजाचा मोठा प्रभाव आहे. महिलांना आणि ओबीसी घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या रणनीतीचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे. शंकर लोधी यांना महत्त्वाची जबाबदारी देत लोधी (लोधी राजपूत) समाजाला साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा समाज कानपूर-बुंदेलखंड, हमीरपूर, महोबा, बांदा, झांसी, जालौन, फतेहपूर आणि उन्नाव भागात प्रभावी मानला जातो.

अभिजात मिश्रा यांची गोरखपूरमधून प्रदेश महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ब्राह्मण चेहरा म्हणून त्यांना पुढे आणत भाजपने तरुण मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. गोरखपूर हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राजकीय गड असल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व आहे. रमेश सिंह यांच्याकडे काशी क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काशीमध्ये वाराणसीसह पूर्वांचलातील अनेक महत्त्वाचे भाग येतात. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मतदारसंघ असल्याने संघटनात्मक दृष्ट्या हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते.

दिलीप पटेल यांची अवध क्षेत्रातून प्रदेश महामंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अवध हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र असून शहरी आणि ग्रामीण मतदारसंघांची मोठी संख्या येथे आहे. यतेंद्र शर्मा यांची प्रदेश मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना राजकीय पत्रकारितेचा मोठा अनुभव असून टीव्ही, डिजिटल आणि निवडणूक कव्हरेजमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. भाजप 2027 पूर्वी केवळ संघटनात्मक नव्हे तर मीडिया रणनीती, नैरेटिव मॅनेजमेंट आणि डिजिटल कम्युनिकेशनवरही विशेष लक्ष देत आहे. एकूणच भाजपने मोठ्या प्रमाणात राजकीय मास्टरस्ट्रोक मारल्याने उत्तरप्रदेशच्या विधानसभेवर कोण झेंडा फडकवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील रस्त्यांसह महामार्गांचीही दुरवस्था, नागरिकांचे प्रचंड हाल

Accident: भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची कारला धडक; ६ मित्रांचा जागीच मृत्यू

Amey Wagh Movie: 'इच्छा पूर्ण होतील, पण...'; अमेय वाघचा 'बायंगी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Housing Society : तुम्हीही सोसायटीतील झाडं छाटण्याच्या तयारीत आहात? आधी ही बातमी वाचा, नाहीतर थेट जेलची हवा

Hair Care: केसगळती थांबवून केसांची वाढ हवी? कढीपत्ता आणि मेथीपासून घरच्या घरी बनवा ‘हे’ खास तेल

SCROLL FOR NEXT