Woman Advocates Fight Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : ही केसच वेगळी! कोर्टाच्या परिसरातच महिला वकिलांमध्ये हाणामारी, व्हिडीओ तुफान Viral

सध्या सोशल मीडियावर दोन महिला वकिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

Satish Daud

Woman Advocates Fight Viral Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सर्वसामान्यांमध्ये वाद किंवा हाणामारी झाली तर प्रकरण कोर्टामध्ये जातं. मात्र, जर कोर्टातील दोन वकिलांमध्ये हाणामारी झाली तर..?  (Breaking Marathi News)

सध्या सोशल मीडियावर दोन महिला वकिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान (Viral Video) व्हायरल होतोय. यामध्ये दोन महिला वकीलच एकमेकींना तुफान मारहाण करताना दिसून येत आहे. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या वकील रस्त्यावर नाही तर चक्क कोर्ट परिसरातच एकमेकींना मारहाण करताहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

व्हिडिओमध्ये काय आहे ?

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला वकिलाच्या ड्रेसमध्ये आहेत. त्या एकमेकींच्या सटासट लाथा बुक्क्यांनी (Women Fight) मारहाण करताहेत. इतकंच नाही तर, त्या एकमेकींच्या झिंज्या देखील उपटत आहेत. या महिलांना भांडताना बघून तेथे उपस्थित असलेले इतर वकील त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

मात्र, तरी सुद्धा या दोन्ही महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दोघींपैकी एकही मागे हटायला तयार नाही. कुणी मध्यस्थी केली की थोडा वेळ शांत बसतात पण लगेच एकमेकींवर तुटून पडतात. आजूबाजूच्या लोकांनासुद्धा या महिलांना आवरणे अवघड झाले आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असल्याचं सांगितलं जातंय. येथील कासगंज जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्टाबाहेर ही हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT