Lucknow roof collapsed: Saamtv
देश विदेश

Lucknow News: हसतं- खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त.. गाढ झोपेत असताना छत कोसळले; एकाच घरातील ५ जणांचा मृत्यू

Lucknow roof collapsed: घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असतानाच ही दुर्देवी घटना घडली. त्यामुळेच घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

Gangappa Pujari

Uttar Pradesh News:

उत्तरप्रदेशच्या लखनौमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मवैया भागात घराचे छत कोसळून एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती- पत्नी आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लखनौ (Lucknow) शहरात आलमबाग रेल्वे कॉलनीत शनिवारी सकाळी जुन्या घराचे छत कोसळले .या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील पाच जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

झोपेत असतानाच काळाने घात केला...

घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असतानाच ही दुर्देवी घटना घडली. त्यामुळेच घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेत 40 वर्षीय सतीश ५ वर्षीय सरोजिनी देवी, १३ वर्षीय हर्षित, १० वर्षीय हर्षिता आणि ५ वर्षीय अंश यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक...

दरम्यान, आलमबाग रेल्वे कॉलनी दुर्घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शोक व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकार्‍यांना मदतकार्याला गती देण्यास सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

SCROLL FOR NEXT