Uttar Pradesh CM Yogi Adityanath Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh : पोलिस अधिकारी लाच घेताना सापडला; CM योगींनी थेट हवालदार बनवलं, वाचा नेमकं काय घडलं?

उत्तरप्रदेशातील रामपूरमधील एका पोलीस अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Satish Daud

Uttar Pradesh News : उत्तरप्रदेशातील रामपूरमधील एका पोलीस अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पोलीस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कडक कारवाई केली आहे. या लाचखोर अधिकाऱ्याला थेट हवालदार बनवा, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृह विभागाला दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराबाबत शून्य धोरण स्वीकारलं आहे. सीएम योगींनी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील रामपूरचे कार्यक्षेत्र अधिकारी (Police) डीएसपी विद्या किशोर शर्मा यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

या व्हिडीओत शर्मा यांनी बलात्काराचे आरोप झालेल्या एका पोलीस निरीक्षकाकडून ५ लाखांची लाच स्वीकारत असल्याचं दिसून आलं होतं. या पोलीस निरीक्षकावर एका महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला होता. आरोपानंतरही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तपासात सदरील पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर कडक कारवाई करत मुख्यमंत्री योगींनी डेप्युटी एसपींना पुन्हा हवालदार बनवण्याचे निर्देश दिलेत.

विद्या किशोर शर्मा यांची उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. प्रमोशन मिळाल्यानंतर ते डेप्युटी एसपी म्हणून रुजू झाले होते. यापूर्वी देखील शर्मा यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी त्यांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. आताच्या चौकशीत तथ्य आढळून आल्याने त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर पाठवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT