Meerut Election Hindu Mahasabha Saam TV
देश विदेश

Meerut Election : मेरठ शहराचं नाव नथुराम गोडसे नगर करणार; हिंदू महासभेची मोठी घोषणा

मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर केले जाणार असल्याचा दावा हिंदू महासभेनं केला.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : अखिल भारत हिंदू महासभा मेरठ महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच एक मोठी घोषणा देखील केली आहे. मेरठमध्ये जर हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेनं केली. (Latest Marathi News)

शिवाय हिंदू महासभेनं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेवरही हिंदू महासभेनं जोरदार टीका केली. मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला.

या वर्षाअखेर मेरठमध्ये महापालिका निवडणुका (Election) होणार आहेत. या निवडणुकीत हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार आहे आणि जर मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आले आणि महापौरपद मिळाले तर मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर केले जाणार असल्याचा दावा हिंदू महासभेनं केला.

यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत. पूर्वी भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदू पक्ष म्हणवत असे, पण आज इतर समाजातील लोकांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा यांनी केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT