Nandurbar Navapur News Saam tv
देश विदेश

Crime News : संतापजनक! डॉक्टरकडून 20 वर्षीय नर्सवर बलात्कार; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Doctor physical abuse nurse : एका विवाहित डॉक्टरने 20 वर्षीय नर्सवर बलात्कार केला. मुराबाद येथील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला.

Satish Daud

कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशातही एक संतापजनक घटना घडली. एका विवाहित डॉक्टरने 20 वर्षीय नर्सवर बलात्कार केला. मुराबाद येथील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जातोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 20 वर्षांची असून ती मुराबाद येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते.

शनिवारी रात्री पीडिता ड्युटीवर असताना रुग्णालयातील डॉक्टर शाहनवाज याने तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. पीडिता कॅबिनमध्ये गेली असता, आरोपीने तिच्यासमोर अश्लील कृत्य केलं. यानंतर पीडितेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉर्ड बॉय जुनैद आणि मेहनाज यांनी तिला जबरदस्तीने रुग्णालयातील वरच्या खोलीत नेले.

त्यानंतर डॉ. शाहनवाज याने पीडितेचा हातपाय बांधून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. रविवारी सकाळी पीडितेने कशीबशी डॉक्टरच्या तावडीतून आपली सुटका करत थेट घर गाठलं. घडलेल्या सर्व प्रकार पीडितेने आपल्या वडिलांना सांगितला.

वडिलांनी तातडीने रुग्णालय गाठत डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपी डॉ. शाहनवाज याला अटक केली. त्याचे दोन्ही साथीदार सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT