Unnao Accident  saam tv
देश विदेश

Unnao Accident: उन्नावमध्ये बस -ट्रकची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Bus And Truck Accident: हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Priya More

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) उन्नावमध्ये भीषण अपघातामध्ये (Unnao Accident) ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिासांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सफीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमल्दीपूर येथे झाला. अपघातग्रस्त बस बांगरमऊवरून उन्नावच्या दिशेने जात होती. जमल्दीपूर गावाजवळ येताच या बसला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक बसची एक बाजू कापत गेला.

या अपघतानंतर बसमधील प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. १० जणांवर उपचार सुरू असून यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा आधीच मृत्यू झाला होता. तर ५ जणांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे.

अपघातग्रस्त बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर ट्रक चालक चकलवंशी मार्गे फरार झाला. पोलिसांनी अपघातानंतर ट्रक चालकाला पकडण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. उन्नाव जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या योग्य उपचार देण्यात यावे असे देखील आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्वचेवर दिसून येतात युरीक एसिडचे धोकादायक संकेत, वेळीच ओळखा

EPF Account: EPF खात्यातील या चुका वेळीच टाळा, अन्यथा दर महिन्याचे फंड कमी होतील

Maharashtra Live News Update : रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर केलेल्या भ्रष्टाचाराचा पुरावा दिला

Jalgaon-Mumbai Flight: आनंदाची बातमी! आता जळगाववरून दीड तासात मुंबई गाठा; जाणून घ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक

निंबाळकरांचा काहीच संबंध नाही, डॉक्टर भगिनीला न्याय देणारच; फलटणमध्ये फडणवीसांचा विरोधाकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT