Mukhtar Ansari Gangster Verdict Saam Tv
देश विदेश

Mukhtar Ansari Gangster Verdict : भाजप आमदार हत्या प्रकरण; मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड

भाजप आमदार हत्या प्रकरण; मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड

Satish Kengar

Mukhtar Ansari Gangster Verdict : उत्तर प्रदेशमधील गुंड आणि माजी आमदार आणि मुख्तार अन्सारीला गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्ट प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

तसेच मुख्तार याचा भाऊ आणि बसपा खासदार अफजल अन्सारी यांच्यावर न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यांच्याविरोधातही न्यायालय दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल देईल, अशी शक्यता आहे. (Latest Marathi News)

यूपीतील प्रसिद्ध कृष्णानंद राय हत्या प्रकरण आणि व्यापारी नंदकिशोर रुंगटा अपहरणानंतर मुख्तार आणि अफजल यांच्यावर गँगस्टर अॅक्टतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अफजल अन्सारी, त्याचा भाऊ माफिया डॉन मुख्तार अन्सारी आणि मेहुणा एजाझुल हक यांच्यावर २००७ मध्ये गँगस्टर अॅक्टतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एजाजुल हक यांचे निधन झाले आहे. या प्रकरणाची सुनावणी १ एप्रिल रोजी पूर्ण झाली. यापूर्वी या प्रकरणाचा निर्णय 15 एप्रिलला येणार होता, मात्र नंतर ही तारीख वाढवून २९ एप्रिल करण्यात आली. या प्रकरणी गाझीपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयात २०१२ साली खटला सुरू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT