Lucknow Ganeshotsav saam tv
देश विदेश

Lucknow Ganeshotsav: लखनऊमध्ये उत्तर प्रदेश मराठी समाजाचा गणेशोत्सव जल्लोषात; अभिनेत्री भाग्यश्री व खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते महाआरती

Marathi community in Lucknow: उत्तर प्रदेशातील महाराष्ट्रातील कुटुंबांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या उत्तर प्रदेश मराठी समाजाकडून लखनऊमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आला. अभिनेत्री भाग्यश्री यांच्या उपस्थितीत गणेश प्राणप्रतिष्ठा, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, मंत्रजागर आणि आरतीचे आयोजन करण्यात आले.

Surabhi Jayashree Jagdish

उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील कुटुंबांनी एकत्र येऊन ‘उत्तर प्रदेश मराठी समाज’ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेकडून दरवर्षी गणेशोत्सव, शिवाजी महाराज जयंती आणि गुढीपाडवा असे विविध सण उत्साहात साजरे केले जातात.

१९८५ पासून संस्थेच्या वतीने ‘श्री गणेश उत्सव मंडळ, चौक लखनऊ’च्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही लखनऊमधील राम मनोहर लोहिया लॉनमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

हिंदी चित्रपट अभिनेत्री भाग्यश्री यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. तसंच मंत्रजागर आणि सामूहिक आरतीचं आयोजन करण्यात आलं.

या कार्यक्रमाला खासदार आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी विनोद तावडे, प्रदेश महामंत्री संजय राय, अमित टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री भाग्यश्री आणि विनोद तावडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

गणेशोत्सव हा मराठी माणसाचा श्वास आहे. या उत्सवामुळे सर्वजण एकत्र येतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि आपलेपणा वाढतो. उत्तर प्रदेशात राहूनही महाराष्ट्राची संस्कृती जपता येत असल्याचा आनंद आहे,’ असं उत्तर प्रदेश मराठी समाजाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितलं.

गजानन पाटील, शोभा पाटील, सागर जाधव, सचिन माळी, विश्वास पाटील आणि विकास पाटील यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव साजरा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Milk Tea Vs Green Tea: दूधाचा चहा की ग्रीन टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

महत्त्वाची बातमी! डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा; पेट्रोल पंपांवर एका ग्राहकाला किती मिळणार डिझेल?

मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून आणखी एक वंदे भारत रुळावर; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

TMC नाव आणि चिन्हाच्या वादावर मोठी अपडेट; शिवसेना पक्ष-चिन्ह वादाचाही सुप्रीम कोर्टाकडून उल्लेख

SCROLL FOR NEXT