car-truck accident in Aligarh highway today  
देश विदेश

कार-ट्रकचा हायवेवर भयंकर अपघात, एकाच कुटुंबातील ४ जणांचा जळून मृत्यू

car-truck accident in Aligarh highway today : अलीगढजवळ भीषण अपघात! कार-ट्रकची समोरासमोर धडक होऊन आग लागली. चार जणांचा जागीच जळून मृत्यू, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल.

Namdeo Kumbhar

Family burnt alive in UP road accident near Akbarabad : उत्तर प्रदेशमधील अलीगढमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामुळे दोन्ही गाड्यामध्ये भीषण आग लागली. त्यामध्ये चार जणांचा जळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्याचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अकराबाद येथील नानऊ पूलाच्या जवळ ही दुर्दैवी घटना घडली. दोन्ही गाड्या अतिशय वेगात होत्या, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

अलीगढपासून २० कमीवर अकराबाद येथे कार अन् ट्रकचा अपघात झाला. दोन्ही गाड्या अतिशय वेगात होत्या. गाड्या इतक्या वेगात धडकल्या की तेलाचा टँक फुटला अन् आग लागली. डिझेलमुळे आग वेगात पसरली अन् क्षणात गाडी आगीत जळून खाक झाली. आतमधील चार जणही जळून खाक झाले. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते.

कारमधील सर्वजण मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत येत होते. त्यावेळी काळाने घाला घातला. मृतामध्ये महिला अन् मुलांचाही समावेश आहे. चारही जणांचे मृतदेह जळून खाक झाले आहेत, त्यामुळे ओळख पटवता आली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मृतामध्ये एक महिला, एक पुरूष आणि दोन चिमुकल्यांच समावेश आहे. लहान मुलांचे वय ५ आणि ८ वर्षे इतकी आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

या दुर्देवी अपघातामध्ये एकजण गंभीर भाजला गेला आहे. त्याच्यावर अलीगढमधील रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येतेय. त्याला उपचारासाठी दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यात येणार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदत केली. कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ६० मिनिटांचा वेळ लागला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World War 3: जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मस्क यांचा इशारा, जगाला टेन्शन

Riteish Deshmukh : "लवकरच येत आहोत..." रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, रिलीज डेट काय?

Ladki Bahin : "आम्हालाच मत द्या, नाहीतर 'लाडकी बहीण'चे ₹१५०० बंद करू, भाजप नेत्यांकडून ब्लॅकमेल"

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Heart Attack: विशी, तिशी आणि चाळिशीतच हार्ट अटॅकचा धोका; फक्त या ५ गोष्टी कराल तर मरणातून वाचाल!

SCROLL FOR NEXT