Hamirpur bridge collapse   ANI
देश विदेश

झोपेतच काळाचा घाला! निर्माणाधीन ब्रिज कोसळला, ६ जणांचा दबून मृत्यू; अनेकजण मलब्याखाली

Hamirpur bridge collapse : उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे निर्माणाधीन पूल अचानक कोसळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. अनेकजण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

UP bridge collapse news, Hamirpur accident today : उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. एका नदीवर सुरू असलेल्या निर्माणाधीन पुलाचा (Bridge) भलामोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. दुर्दैवी बाब म्हणजे, दिवसभर काम करून थकलेले मजूर याच पुलाच्या खाली झोपलेले होते. रात्री गाढ झोपेत असतानाच हा पूल अंगावर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मलब्याखाली आणखी काही मजूर अडकल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासनाकडून मदतकार्य करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या भीषण वादळात बेटवा नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक मोठा भाग अचानक कोसळला. सार्वजनिक वाहतुकीसाठी बांधण्यात येत असलेला हा पूल अनेक जीवितहानीस कारणीभूत ठरला. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी बरेच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक अधिकारी आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य करण्यात येत आहे. अनेक लोक अजूनही अडकल्याचा अंदाज आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हमीरपूरमधील मोरा कंदार आणि कुरारा भागांना जोडण्यासाठी एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. गुरूवारी रात्री उशिरा परिसरात अचानक जोरदार वादळ आले. याच दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा एक मोठा स्लॅब पत्त्यांच्या घराप्रमाणे अचानक कोसळला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हमीरपूर पूल कोसळल्याच्या घटनेची तात्काळ दखल घेतली. त्यांनी मृतांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य वेगात करण्याचे निर्देश दिले. तसेच जखमींना तात्काळ उपचार करण्याचेही आदेश दिले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी 'दारूकांड' तपास सी आय डी करण्याची शक्यता

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Health Care: स्ट्रॉन्ग हेल्थसाठी आलिया भट्टचा हा सुपरफूड नक्की खा; वाढेल दुप्पट एनर्जी

Sunday Mega Block : रेल्वे प्रवाशांनो, गरज असेल तरच लोकल प्रवास करा, मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कधी?

मोठी बातमी! 42 दिवसांनंतर भोंदू बाबाला जमीन मंजूर

SCROLL FOR NEXT