monkeypox virus Saam Tv
देश विदेश

monkeypox virus : मंकीपॉक्सच्या 'त्या' संशयित रुग्णाचा रिपोर्ट अखेर आला

उत्तर प्रदेशातील (UP) गाझियाबादमध्ये मंकीपॉक्स (monkeypox virus) संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर आला आहे.

Nandkumar Joshi

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील (UP) गाझियाबादमध्ये मंकीपॉक्स (monkeypox virus) संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर आला आहे. संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज, मंगळवारी अहवाल आला आहे. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे वृत्त आहे. (Monkeypox virus News In Marathi )

मंकीपॉक्स या विषाणूने (monkeypox virus) जगभरातील अनेक देशांना धडकी भरवली आहे. भारतात अद्याप या आजारानं शिरकाव केला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका पाच वर्षीय मुलीमध्ये मंकीपॉक्स या विषाणूची लक्षणे आढळली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पुण्यातील (Pune) एनआयव्हीमध्ये रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल आज मंगळवारी प्राप्त झाल्याचे कळते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या मुलीच्या शरीरावर व्रण आणि खाज येत होती. त्यावेळी गाझियाबादच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मुलीला इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नाहीत. खबरदारी म्हणून चाचणी केली जात आहे. तिच्या घरातील किंवा नातेवाइकांपैकी कुणीही विदेशात गेलेला नाही किंवा परदेशातून घरी परतलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

इतर देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य विभागाकडून गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या होत्या. देशात मंकीपॉक्सचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी काय पावलं उचलावीत, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हे सुनिश्चित करण्यात यावे, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

SCROLL FOR NEXT