Frog Leg Found In Samosa Saam Tv
देश विदेश

Viral Video: चाललंय तरी काय? बिकानेरच्या समोस्यामध्ये आढळला बेडकाचा पाय, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल किळस

Priya More

बिकानेरच्या समोस्यामध्ये काही महिन्यांपूर्वी झुरळ आढळले होते. ही घटना ताजी असतानाच आता बिकानेरच्या समोस्यामध्ये बेडकाचा पाय आढळला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. व्हायरल होणार व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील किळस येत आहे. कमेंट्स करत ते संताप व्यक्त करत आहेत. आपण खातोय ते खरंच चागल्या ठिकाणी बनवलं जातंय की नाही? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

गाझियाबादच्या इंदिरापुरमच्या अभय खंड याठिकाणी असलेल्या बिकानेर या मिठाईच्या दुकानातला हा व्हायरल व्हिडीओ आहे. एका व्यक्तीने बिकानेर स्वीट्स होममधून समोसा खायला घेतला होता. हा समोसा खात असताना या व्यक्तीला त्यामध्ये बेडकाचा पाय दिसून आला. त्याने तात्काळ याचा व्हिडीओ तयार करून बिकानेर स्वीट्स होममध्ये जाऊन जोरदार राडा घातला.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती अमन शर्मा आहे. ते न्याय खंड भागातील रहिवासी आहे. अमन आपल्या काही मित्रांसोबत अभय खंड येथील बिकानेर या मिठाईच्या दुकानात समोसे खाण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने आपल्या मित्रांसोबत काही समोसे खाण्यासाठी घेतले. समोसा खाण्यासाठी घेतला असता त्याला मोठा धक्का बसला. कारण या समोस्यात बेडकाचा पाय होता. त्यानंतर तो तसाच समोरा घेऊन बिकानेरच्या दुकानात पोहोचला आणि तिथे त्याने गोंधळ घातला. यावेळी दुकानामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली. अमनने जाब विचारला पण दुकान मालकाकडे काहीच उत्तर नव्हते.

दुकानामध्ये गोंधळ सुरू असताना १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना तक्रार करण्यात आली. त्यावेळी दुकान मालक हे सर्व चुकून झाले असल्याचे बोलू लागला. तेव्हा अमनने दुकान मालकाला जाब विचारला की, 'माझ्या समोस्यामध्ये जर बेडकाचा पाय आहे तर संपूर्ण मसल्यामध्ये बेडूक पडला असावा. हा समोसा तू खाणार आहेस का?' पोलिस येईपर्यंत याठिकाणावर राडा सुरूच होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये असलेल्या बिकानेरच्या दुकानामधील समोस्यामध्ये झुरळ आढळले होते. त्यावेळी देखील जोरदार राडा झाला होता. नवी मुंबई महानगर पालिकेने या दुकानावर कारवाई केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT