माजी मंत्री राम आसरे कुशवाहा यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला.
जवळपास १३ वर्षांनंतर त्यांची सपा मध्ये पुन्हा वापसी झाली आहे.
कुशवाहा उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहावेळा मंत्री राहिले असून ते सपा राष्ट्रीय महासचिवही राहिले आहेत.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडलीय. माजी मंत्री राम आसरे कुशवाहा यांनी भाजप सोडून पुन्हा एकदा समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. जवळपास १३ वर्षांच्या कालावधीनंतर ते पुन्हा समाजवादी पक्षात सामील झालेत. कुशवाहा यापूर्वी समाजवादी पक्षाशी संबंधित होते. कुशवाहा यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात बसपापासून केली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते, आता ते पुन्हा एकदा समाजवादी पक्षात परतलेत.
राम आसरे कुशवाह हे कानपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात बहुजन समाज पक्षापासून (BSP) केली. १९९६ मध्ये याच पक्षाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते समाजवादी पक्षात (SP) सामील झाले. समाजवादी पक्षात त्यांच्यावर संघटनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या आणि त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही काम पाहिलंय.
कुशवाह हे मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते उत्तर प्रदेशच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. त्यांनी पक्षसंघटना आणि सरकार अशा दोन्ही स्तरांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध राहिले आहेत.
२०१३ मध्ये राम आसरे कुशवाह हे समाजवादी पक्षाचे (SP) राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्या काळात मुझफ्फरनगर दंगलींबाबत त्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. परिणामी, त्यांना पक्षातील पदावरून हटवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष सोडला. पक्षापासून वेगळे झाल्यानंतर कुशवाह यांनी आपली राजकीय वाटचाल बदलली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आता, जवळपास १३ वर्षांच्या वेगळ्या राजकीय प्रवासानंतर ते पुन्हा समाजवादी पक्षात परतले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.