UP Etawah Road Accident Saamtv
देश विदेश

UP Road Accident: जीवघेणा थरार! मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घातला; मामा- भाच्यासह चौघांचा मृत्यू

UP Etawah Road Accident: अपघात झालेला ट्रक झारखंडमधून केबल्स भरून दिल्लीच्या दिशेने जात होता. कानपूर- आग्रा महामार्गावर (Kanpur Agra Highway) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट चहाच्या दुकानात शिरला.

Gangappa Pujari

UP Accident News:

उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या कानपूर- आग्रा महामार्गावर एक भरधाव ट्रक थेट चहाच्या दुकानात घुसल्याने मोठी दुर्घटना झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

इटावामध्ये (Etawah) भरधाव ट्रक फुटपाथ तोडून एका दुकानात घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (१६, डिसेंबर) रात्री १०.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघात झालेला ट्रक झारखंडमधून केबल्स भरून दिल्लीच्या दिशेने जात होता. कानपूर- आग्रा महामार्गावर (Kanpur Agra Highway) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट चहाच्या दुकानात शिरला.

यावेळी दुकानात असलेल्या चार जणांचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ट्रॉलीने धडक दिल्याने दुचाकीस्वारही जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि सीओ सिटी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी क्रेन आणि जेसीबी मागवून जखमींना बाहेर काढण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातामध्ये (Accident) मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आले आहेत तर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी सांगितले की, अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

मामा भाच्याचा मृत्यू...

दुर्दैवी बाब म्हणजे या अपघातात मामा- भाच्याचाही मृत्यू झालाय. दुचाकीवरुन जात असताना मामा- भाचे चहा पिण्यासाठी त्या दुकानात थांबले होते. त्याचवेळी काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Maharashtra News Live Update: मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

SCROLL FOR NEXT