UP Exit Poll
UP Exit Poll Saam TV
देश विदेश

UP Exit Poll: उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कोणत्या पक्षाकडे? आतुरता संपवा, पहा सामचा एक्झिट पोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा (Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Manipur and Goa) या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं असून आता फक्त सर्वांना निकालाची आतुरता लागली आहे. यासाठीत आज साम टिव्हीने जो सर्वे केला आहे त्यानुसार बऱ्यापैकी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात आला आहे.

पाचही राज्यामंधील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या (UP) विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे करण्यात आले होते. १०, १४ , 20 , 23 , 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी मतदान पार पडलं होत.

पहा व्हिडीओ -

सामच्या एक्झिट पोलनुसार (Saam Exit Poll) उत्तरप्रदेश मध्ये मागील वेळी सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) या निवडणुकीमध्ये २०० ते २१६ जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे. तर यावेळी भाजपला अगदी जोरदार टक्कर दिलेला पक्ष म्हणजे अखिलेश यादवांची (Akhilesh Yadav) समाजवादी पार्टी (SP) त्यांना या निवडणुकीत १३७ ते १५७ जागा मिळण्याची शक्यता आहे आणि सपाच्या याच घौडदौडीमुळे भाजपच्या ३०० पार या घोषणेला कुठेतरी आव्हान मिळणार आहे.

दरम्यान कधीकाळी पुर्ण उत्तर प्रदेशवर आपली एकहाती सत्ता गाजवणारा मायावतींच्या (Mayawati) बहुजन समाजवादी पक्षला (BSP) मात्र जास्त जागा मिळवू शकत नसल्याचं चित्र आहे पोल नुसार त्यांना १२ ते २२ जागा भेटू शकतात.

तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Rahul Gandhi and Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वात स्त्रीयांसाठी अनेक आश्वासन दिली तरी देखील त्यांना युपीतील जनतेन काँग्रेसला जास्त पसंती दिली नसल्याचं चित्र समोर येत आहे कारण सामच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला फक्त ४ ते १५ जागांवरती समाधान मानावं लागणार आहे. तर इतर अपक्षांना ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: सांगलीत अंकलखोपमधील मतदान यंत्रात बिघाड

Inflation Fall In Pakistan: महागाईने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; १ कप चहासाठी नागरिकांची वणवण

Kanakalatha Dies : प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रदीर्घ आजाराने निधन; २५० हून अधिक चित्रपटांत केले होते काम

Dance Effect on Health : मनसोक्त नाचा! डान्स करण्याचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Top Vegetarian Country: जगातील शाकाहारी लोकांची टक्केवारी आली समोर ; भारताचा क्रमांक कितवा?

SCROLL FOR NEXT