Uttar Pradesh Fatehpur Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! बंद खोलीत आई मुलासह आढळला काकाचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh Fatehpur Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका बंद घरात आई, मुलगा आणि दीर यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • फतेहपूर जिल्ह्यात बंद घरात तीन मृतदेह आढळले

  • मृतांमध्ये आई, मुलगा आणि दीर यांचा समावेश

  • मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने खळबळ

  • पोलिसांचा प्राथमिक अंदाज आत्महत्येचा

  • प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Uttar Pradesh Fatehpur 3 Sucide Death Body Found उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका बंद घरात तीन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. मृतांमध्ये ५५ वर्षीय सुशीला, २८ वर्षीय मुलगा अमर आणि सुशीला यांचा ५३ वर्षीय दीर सुनील अशी नावे आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांनी म्हटले आहे की, या तिघांनी आत्महत्या केली आहे. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सदर कोतवाली परिसरातील चौफीरवा गावात ही घटना घडली. सुशीला यांचे पती सुशील कुमार श्रीवास्तव (वय ५५) हे ड्रायव्हर आहेत. सुशील हे घटनेच्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलीच्या घरी गेला होते. संध्याकाळी ते परत आले तेव्हा वारंवार हाक मारूनही त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही.

घाबरलेल्या सुशील यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला, तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले, तर त्यांचा धाकटा भाऊ सुनील गंभीर जखमीरित्या आढळला. सुनीलला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, तिघांच्याही मानेवर खोल जखमा होत्या, मनगट कापले होते आणि चार रक्ताने माखलेले ब्लेड सापडले.

पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घरगुती वादातून आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या प्रकरणी कोणतेही ठोस कारण समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT