Uttar Pradesh Crime News Saamtv
देश विदेश

UP Crime News: जन्मदात्या बापाचे सैतानी कृत्य! दुसरे लग्न करण्यासाठी दिली लेकाच्या हत्येची सुपारी

UP Latest News: बाप- लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मेरठमधून समोर आली आहे.

Gangappa Pujari

Uttar Pradesh Crime News: बाप- लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात जन्मदात्या बापानेच आपल्या एकुलत्या एका मुलाची सुपारी देवून हत्या केली. माजी सैनिक असलेल्या या पित्याने दुसरे लग्न करण्याठी हे क्रूर कृत्य केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडिलांनीच मुलाची सुपारी देवून हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार मेरठ (Meerut) जिल्ह्यातील सरधना गावात घडला आहे. संजीव कुमार असे या निर्दयी बापाचे नाव असून सचिन कुमार असे मृत मुलाचे नाव आहे. मुलाचा खून करण्यासाठी गावातीलच अमित नावाच्या तरुणाला 5 लाखांची सुपारी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने शनिवारी दाखल केली होती. तक्रारीत, तिने आपल्या मुलाच्या बेपत्ता होण्यामध्ये तिच्या पतीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. या माहितीवरून पोलिसांनी संजीव आणि अमित या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.

धक्कादायक कारण

आरोपी संजीव कुमारचे त्याच्या मेहुणीशी प्रेमसंबंध होते आणि तो तिच्यासोबत राहत होता, त्यामुळे त्याची पत्नी मुनेश हिने १५ वर्षांपूर्वी त्याला सोडून दिले. तेव्हापासून ती आपल्या मुलासोबत वेगळी राहते. संजीव कुमारला दुसरे लग्न करायचे होत, मात्र या लग्नाला मुलाचा विरोध होता. याच कारणाने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली आहे.

सचिनला मारण्यासाठी आरोपी अमितने मंगळवारी आधी त्याला दारू पाजली. दारुची नशा चढल्यानंतर त्याच्या डोक्यावर बाटलीने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. तसेच संशय न येण्यासाठी त्याचा मोबाईल, दुचाकीच्या नंबरप्लेट वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडच्या परळीत आता सोमवारी मांस विक्रीवर बंदी, पालिकेनं का घेतला निर्णय?

Maharashtra News Live Update: सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रायगड मधील समुद्र किनारे हाऊसफुल

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण, वाचा

Business Opportunities After 12th : १२ वी नंतर Business चा विचार करताय? वाचा ५ स्टार्टअप आयडिया, खर्च कमी अन् मोठा नफा

SCROLL FOR NEXT