22-Year-Old Woman Killed by Her Own Brother Saam Tv
देश विदेश

कोबीच्या शेतात सापडला तरूणीचा रक्तानं माखलेला मृतदेह; 'असं' फुटलं हत्येचं बिंग

22-Year-Old Woman Killed by Her Own Brother: उत्तरप्रदेशमधील शाहजहांपूर येथे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. क्षु्ल्लक कारणावरून भावानं बहिणीला संपवलं.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर स्थित इटौरा गौटियामधून भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कोबी आणि मेथीच्या शेतात एका तरूणीचा मृतदेह आढळला. मृतदेह रक्ताने माखलेला होता. प्राथमिक माहितीनुसार, भावाने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार करून संपवलं. मंगळवारी दुपारी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मदन पाल हे आपल्या कुटुंबासह इटौरा गौटिया गावात राहतात. त्यांना मैना देवी (वय वर्ष २२) आणि शेर सिंग (वय वर्ष १९) नावाचा मुलगा आहे. मंगळवारी दुपारी मैनाचा मृतदेह शेतात आढळला. तिचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला. तिचा धाकटा भाऊ शेर सिंग बेपत्ता असल्याचं पोलिसांना सांगितलं.

पोलिसांना मृत तरूणीच्या धाकटा भाऊ शेर सिंग याच्यावर संशय आहे. पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतलं आहे. चौकशीत त्यानं बहिणीची हत्या केली असल्याचं कबूल केलं. शेर सिंगनं सांगितलं की, 'वडिलांनी बहिणीचे अनेक वेळा लग्न लावून दिले. पण तिनं प्रत्येक वेळी मोडले. माझी बहीण अनेक तरूणांशी बोलत होती'.

'तेव्हा इतर तरूणांसोबत का बोलतेस? असा जाब त्यानं विचारला. मैना तेव्हा काहीच बोलली नाही. तिचा जबरदस्ती फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने दिला नाही', अशी माहिती शेर सिंग यांनी दिली. 'मंगळवारी मैना शेतात असताना तिचा मोबाईल फोन मागितला. तेव्हा तिनं नकार दिला. हे ऐकून माझा राग अनावर झाला', असं शेर सिंग म्हणाला.

वादावादीमध्ये तरूणानं बहिणीवर धारदार शस्त्राने वार केले. गळ्यावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत मैना देवी शेतातच कोसळली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करून आरोपी शेर सिंगला ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghevda Bhaji Recipe: गावरान पद्धतीची घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची?

Pune : पुण्यात भेट द्यायलाच हवी अशी 5 पर्यटन स्थळे, नक्की फिरायला जा

Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय; कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम

Papaya Benefits: थंडीत पपई खाल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे, आठवड्यातून २ दिवस नक्की खा

लॅपटॉपच्या दरात मोठी कपात; Jio चा Laptop चक्क 12,490 रुपयांमध्ये मिळतोय

SCROLL FOR NEXT