Constable Arrested Over Inspector’s Death Saam
देश विदेश

अनैतिक संबंध, 'नको ते व्हिडिओ' पाठवून ब्लॅकमेल; पोलीस महिलेच्या त्रासाला कंटाळून इन्स्पेक्टरनं आयुष्य संपवलं

Constable Arrested Over Inspector’s Death: जालौनमध्ये इन्स्पेक्टर अरुण राय यांनी सर्व्हिस पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस महिलेवर गंभीर आरोप आणि अटक.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील जालौन येथील कुठौंद पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अरूण कुमार राय यांच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. पोलीस महिला मीनाक्षी शर्मा या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अरूण कुमार राय यांनी पोलीस स्टेशन आवारातील त्यांच्या निवासस्थानी सर्व्हिस पिस्तूलने गोळी आत्महत्या केली होती. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली होती.

सुरूवातीला हे प्रकरण आत्महत्या असल्याचं दिसून आलं. मात्र, पोलीस तपासात अनेक धागेदोरे सापडले. मृत इन्स्पेक्टरची पत्नी माया राय यांनी ही घटना आत्महत्या नसून खून असल्याचा दावा केला आहे. तसेच पोलीस महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तिची न्यायालयिन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी आणि इंस्पेक्टर राय यांच्यात बेकायदेशीर संबंध असल्याचे समोर आले आहे. मीनाक्षीची लवकरच लग्न ठरणार होते. तिनं इंस्पेक्टरकडून २५ लाख रूपयांची मागणी केली होती. याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून अरूण राय यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला, असा संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वीही मीनाक्षीन पीलीभीत जिल्ह्यातील एका कॉन्स्टेबलवर बलात्काराचा आरोप करून त्याला तुरूंगात पाठवले होते. त्या प्रकरणातही तिने २५ लाख रूपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, पोलीस विभागातील इतर काही कर्मचाऱ्यांनाही मीनाक्षीने अशाच प्रकारे त्रास दिल्याची चर्चा असून, संबंधित प्रकरणांचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून दर महिन्याला मिळणार ६१,००० रुपये

Pineapple Benefits: हिवाळ्यात अननस खाल्ल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवण्याचं रहस्य, आचार्य चाणक्यांचे ५ मंत्र बदलतील तुमचं करिअर

सांगली महापालिकेसाठी अजितदादांनी डाव टाकला; निम्या जागांवर दावा ठोकला, महायुतीची मोट कशी बांधली जाणार?

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली निवडणुकीवरून शिंदेसेनेच्या जिल्हा प्रमुखाने पुन्हा भाजपला डिवचले

SCROLL FOR NEXT