देश विदेश

Crime News : कोयत्याने वार करत पतीने घेतला पत्नीचा जीव, त्यानंतर मृतदेहाजवळ बसला, परिसरात खळबळ

Uttar Pradesh Crime News: आग्रा येथे एका पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला करून तिची हत्या केली. हत्येनंतर तो मृतदेहाजवळ बसला. कुटुंबीयांनी पोलिसांना फोन करून आरोपीला ताब्यात घेण्यास मदत केली.

Dhanshri Shintre

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील पिनाहटच्या झोरियनपुरा गावात बुधवारी दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना ग्रामस्थांना हादरवून टाकणारी ठरली. गावातील कालीचरण नावाच्या एका व्यक्तीने कोयत्याने वार करून आपल्या पत्नी उर्मिला देवीची निर्घृण हत्या केली. हत्या करून तो घटनास्थळावरून पसार झाला नाही, तर पत्‍नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला होता. हे दृश्य पाहून कुटुंबीय आणि गावकरी घाबरून गेले आणि त्यांनी आरडाओरडा करत पोलिसांना कळवले. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ही घटना दुपारी २:३० च्या सुमारास घडली. स्थानिक पोलिस अधिकारी डीसीपी पूर्व सय्यद अली अब्बास यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम गावात पाठवण्यात आली. कालीचरणने आपल्या पत्नीच्या मान, कंबर आणि शरीरावर धारदार कोयत्याने अनेक वार केले होते. त्याची आई घरात आली तेव्हा उर्मिला मृत अवस्थेत होती आणि तिचा पती मृतदेहाजवळ बसून होता. त्याच्या वर्तनामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कालीचरणच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याला अकस्मात कोणाकडून धोका निर्माण झाल्यासारखे भासते आणि अशावेळी तो हल्ला करतो. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मोठ्या भावावर प्राणघातक हल्ला केला होता. याशिवाय, त्याने गळफास घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. कुटुंबीयांनी पोलिसांना औषधांची पिशवी दाखवत त्याच्या आजाराचे पुरावेही दिले.

घटना घडण्याच्या काही तासांपूर्वी, सकाळी कालीचरण व उर्मिला शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर कालीचरण आपल्या खोलीत गेला आणि थोड्याच वेळाने पत्नीवर अचानक हल्ला करून तिचा जीव घेतला. उर्मिलाला सहा मुले असून तीच त्यांची काळजी घेणारी होती. तिच्या मृत्यूमुळे मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी विचारले की, आता या बालकांची जबाबदारी कोण घेणार, कारण त्यांचा आधार हरपला आहे.

पोलिसांनी उर्मिलाचे पालक जे मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील अंबा येथे राहतात, त्यांना या घटनेबाबत माहिती दिली आहे. आरोपी कालीचरणला न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना मानसिक आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीच्या आक्रमकतेमुळे घडली असल्याचा अंदाज तपासातून पुढे आला असला तरी नेमक्या कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prarthana Behere: ही मराठमोठी अभिनेत्री मासिक पाळी दरम्यान गेली देवीच्या दर्शनाला; म्हणाली,'देवी तू माझी आई...'

Whatsapp New Feature: फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, कमाल आहे व्हॉट्सअ‍ॅपचं डायलिंग फीचर

Kidney Failure Symptoms: किडनी फेल्युअरची 'ही' लक्षणं लघवीद्वारे दिसतात, वेळीच लक्ष द्या

Pankaja Munde: कुणाची सुपारी घेऊन आलात..., पंकजा मुंडे भगवान गडावरील मेळाव्यात नेमक्या कुणावर चिडल्या?

Hair Care : केस मोकळे ठेवून झोपावं की बांधून? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT