Uttar Pradesh Crime News  Saam TV
देश विदेश

Viral News : पत्नी प्रियकरासोबत हॉटेलात; पतीने रंगेहाथ पकडलं, भर रस्त्यात तुफान राडा

पतीने आपल्याच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं. यानंतर पतीने मोठा राडा केला. पतीने कमरेचा बेल्ट काढून पत्नी आणि तिच्या प्रियकराची भररस्त्यात चांगलीच धुलाई केली.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील जिल्हा मुख्यालयात असलेल्या एका हॉटेलमध्ये पतीने आपल्याच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं. यानंतर पतीने मोठा राडा केला. पतीने कमरेचा बेल्ट काढून पत्नी आणि तिच्या प्रियकराची भररस्त्यात चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

भर रस्त्यात पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराची पट्ट्याने धुलाई करत असल्याने रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कुणीही या भांडणात मध्यस्थी करायला तयार नव्हतं. अखेर पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची माहिती (Crime News) मिळाली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत. पती पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतलं.

काय आहे प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, महाराजगंज येथे राहणाऱ्या एका तरुणाचे आपल्याच गावाशेजारील राहणाऱ्या एका तरुणीसोबत २०१७ मध्ये लग्न झाले होते. काही वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर दोघांमध्ये अचानक खटके उडू लागले. पती कामावर जाताच पत्नी दिवसभर कुठेतरी फिरण्यासाठी जात होती. त्यामुळे पतीला पत्नीवर संशय आला होता.

आपल्या पत्नीचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय या तरुणाला होता. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. अनेकदा दोघांचे भांडण गावातील प्रधानांपर्यंत गेलं. मात्र, प्रधानांनी सांगून सुद्धा त्यांचा वाद काही मिटला नाही. त्यामुळे पतीने आपल्या पत्नीवर नजर ठेवणं सुरू केलं.

एकेदिवशी पतीने कामावर जाण्याचं नाटक केलं आणि तो घरातील गच्चीवर लपून बसला. पती कामावर गेल्याचं कळताच, पत्नी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. रस्त्यात अचानक ती एका व्यक्तीच्या दुचाकीवर बसून निघून गेली. पतीने दोघांचाही पाठलाग केला असता, ते दोघेही एका हॉटेलात गेल्याचं पतीला दिसलं.

या गोष्टीवरून पती चांगलाच संतापला. त्याने आपल्या मित्रांना बोलावून हॉटेलमध्ये राडा केला. मॅनेजरकडून रुमची दुसरी चावी घेऊन दरवाजा उघडला. तिथे पत्नीला आपल्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीला धक्काच बसला. हा प्रकार बघताच पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराला बेल्टने मारहाण केली.

भर रस्त्यात पतीला आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची धुलाई करताना बघून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पती पत्नी आणि तिच्या प्रियकराला मारहाण करत असताना कुणीही मध्यस्थी केली नाही. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांनी पती-पत्नीची समजवूत काढून हे प्रकरण मिटवलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक

Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

SCROLL FOR NEXT