Bodies Of Two Friends Found Hanging On Tree Saam Tv
देश विदेश

Crime News: धक्कादायक! झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले जीवलग मैत्रिणींचे मृतदेह, नेमकं काय घडलं?

Bodies Of Two Friends Found Hanging On Tree: उत्तर प्रदेशमध्ये दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली. फरूर्खाबाद जिल्ह्यातील भगौतीपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Priya More

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) दोन मैत्रिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फरूर्खाबाद जिल्ह्यातील भगौतीपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. फॉरेन्सिक टीमकडून देखील तपास सुरू आहे. पोलिसांनी (Uttar Pradesh Police) या घटनेला आत्महत्या असल्याचे म्हटलं तर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगौतीपूर गावामध्ये राहणाऱ्या रामवीर जाटव यांची मुलगी बबली आणि महेंद्र जाटव यांची मुलगी शशि या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या दोघी एकत्र मंदिरामध्ये गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत आल्याच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्या आत्याच्या घरी गेल्या असाव्यात असे वाटले.

मुली सकाळी घरी न आल्यामुळे दोघींचे देखील कुटुंबीय चिंतेत आले होते. पण सकाळी गावातील नागरिकांना या दोन्ही मुलींचा मृतदेह गावामध्ये असलेल्या आंब्याच्या बागेतील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे भगौतीपूर गावामध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मुलींच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. त्यानंतर संपूर्ण गावानेच घटनास्थळी मोठी गर्दी केली. मुलींना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.

पोलिस अधिक्षक अलोक प्रियदर्शी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यांनी फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी बोलावून घेतलं. मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिस मृत मुलींच्या कुटुंबीयांशी बोलले. पोलिस अधिक्षक डॉ. संजय कुमारने या मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पण मुलींनी आत्महत्येचे पाऊल का उचलले या मागचे कारण समजू शकले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण समोर येईल. मुलींच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT