Student Shot Teacher saam tv
देश विदेश

Student Shot Teacher: बापरे! विद्यार्थ्यांनी शिक्षकावर झाडली गोळी; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Uttar Pradesh Viral Video : बंदूकीत ४० गोळ्या होत्या एक मारलीये आणि ३९ बाकी आहेत.

Ruchika Jadhav

Student Crime News:

उत्तर प्रदेशच्या आगरायेथे गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकावरच गोळी झाडलीये. गोळी लागल्यावर उपस्थित अन्य व्यक्तींनी शिक्षकाला रुग्णालयात दाखल केले. सध्या शिक्षकावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजले आहे. (Latest Crime News)

विद्यार्थ्यांची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आणि तो व्हायरलही केला. व्हिडीओमध्ये या विद्यार्थ्यांनी म्हटलंय की, "बंदूकीत ४० गोळ्या होत्या एक मारलीये आणि ३९ बाकी आहेत. महिन्याभरानंतर पुन्हा त्याला गोळी मारणार" असं या तरुणांनी म्हटलं आहे.

ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशच्या आगरामधील खंदौली येथे घडलीये. पोलीस आयुक्त पश्चिमी सोनम कुमार यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी क्लासजवळ जाऊन उभे राहिले. त्यांनी शिक्षकाला काही कारणास्तव बाहेर बोलवून घेतले. शिक्षक बाहेर आल्यावर या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पायावर गोळी झाडली आणि तेथून पळ काढला.

शिक्षकाचा मोठा भाऊ आणि विद्यार्थी यांच्यात काही कारणास्तव वाद झाल्याचं म्हटलं जातंय. भावाशी असलेल्या भांडणाचा विद्यार्थ्यांनी शिक्षकावर हल्ला करून बदला घेतलाय, अशीही चर्चा होतेय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी टीम तयार केली आहे. गावात सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आसं पोलिसांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT