CM Yogi Adityanath  Saam TV
देश विदेश

CM Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, गुन्हा दाखल

Uttar Pradesh News : महानगर कोतवाली येथे तैनात हेड कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh Crime News :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने सुरक्षा मुख्यालयाच्या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर महानगर कोतवाली येथे तैनात हेड कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.  (latest marathi news)

शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सुरक्षा मुख्यालयात फोन केला. तो कॉल घटनास्थळी तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी उचलला. या फोनवरून फोन करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. हेड कॉन्स्टेबलने कॉलरचे नाव विचारले तेव्हा त्याने कॉल कट केला.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु केली आहे. पोलीस कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहे. पोलिस फोन नंबरच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत. ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर सर्विलान्सवर टाकण्यात आला असून त्याचे लोकेशन तपासले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT