Yogi Adityanath Saam Tv
देश विदेश

CM Yogi Adityanath Threat: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?

CM Yogi Adityanath Death Threat: या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे

Shivani Tichkule

UP News: यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अज्ञात व्यक्तीने 112 क्रमांकावर मेसेज करून ही धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. सीएम योगी यांना मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. (Latest Marathi news)

सीएम योगी (Yogi Aditynath) यांना धमक्या मिळाल्यानंतर सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशन परिसरात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) आरोपींविरुद्ध कलम ५०६ आणि ५०७ आयपीसी आणि ६६ आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

23 एप्रिलच्या रात्री व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक 112 वर एक मेसेज आला. हा संदेश संपर्क अधिकारी शिखा अवस्थी यांनी पहिला, ज्यामध्ये सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या मेसेजचा स्क्रिन शॉट घेतला आणि तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ही धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. (Political News)

फेसबुकवर धमक्याही दिल्या होत्या

सीएम योगी आदित्यनाथ यांना अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही , योगी सरकारने उचललेल्या कठोर पावलांमुळे त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. आठवडाभरापूर्वीही त्यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

ही फेसबुक पोस्ट बागपतच्या अमन रझा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती, त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT