jhansi kanpur highway Car accident  Saam TV
देश विदेश

Accident News: लग्नघरावर शोककळा, भरधाव आयशरची नवरदेवाच्या कारला धडक; वरासह चौघांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Jhansi Car Accident : उत्तर प्रदेशच्या झाशी-कानपूर महामार्गावर एक मोठा अपघात झाला. आयशर टेम्पोने नवरदेवाच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत वरासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

उत्तर प्रदेशच्या झाशी-कानपूर महामार्गावर एक मोठा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने नवरदेवाच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. पेट्रोल टाकी फुटल्याने कारला भीषण आग लागली. या घटनेत नवरदेवासह चौघांचा होरपळून मृत्यू झाला.

आकाश अहिरवार (वय २५) असं मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचं नाव आहे. अपघातात नवरदेवाचा भाऊ आशिष अहिरवार, पुतण्या मयंक (वय ४) आणि कार चालक जयकरण उर्फ ​​भगत यांचाही समावेश आहे. सुदैवाने या अपघातातून दोघे बचावले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, झाशीच्या बिलती गावात राहणारा आकाश अहिरवार याचा शुक्रवारी १० मे रोजी विवाह होता. यासाठी बडा गाव पोलीस ठाणे हद्दीतील छपर गावातून वरात निघाली होती.

वरात कानपूर महामार्गावरील परिचा ओव्हर ब्रिजजवळ आली असता, त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आयशर टेम्पो आला. काही क्षणातच आयशरने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

अपघातात कारची पेट्रोल टाकी फुटल्याने अचानक कारला भीषण आग लागली. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर डीसीएम चालक फरार झाला. नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.

अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणली. कारमधून दोघांना बाहेर काढण्यात आले. आग विझवल्यानंतर पोलिसांनी कारमधून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहेर कॉम्प्यूटर सेंटरचं पोस्टर, आत वेश्याव्यवसाय; पोलिसांनी तरूणींना रंगेहाथ पकडलं

Curd Water : दह्याला सुटलेले पाणी प्यावे की टाकून द्यावे? वाचा तज्ज्ञांचे मत

Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Dark Chocolate Cake: वजन आणि हृदयासाठी फायदेशीर डार्क चॉकलेट केक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

India Tourism: खंडाळ्याला हमखास विसराल! वसईपासून ५ तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT