uttar pradesh  Saam tv
देश विदेश

भीषण अपघाताचा थरार! भरधाव कार कंटेनरला धडकली, ५ जणांचा जागीच मृत्यू

uttar pradesh accident : उत्तर प्रदेशमध्ये अपघाताचा थरार घडला. भरधाव कार थेट कंटेनरला धडकली. यात पाच जणांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशमध्ये घडली अपघाताची भीषण घटना

भरधाव कार अनियंत्रित होऊन घडला अपघाताचा थरार

अपघातात कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशच्या आजमगड जिल्ह्यातील पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. यात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. भीषण अपघातामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, आजमगड जिल्ह्याच्या कंधरापूर पोलीस स्टेशनच्या पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर अपघात झाला. हरियाणाची ही कार लखनौच्या दिशेने चालली होती. ही कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्यावरील कंटेनरला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. स्थानिक लोक आणि इतर वाहनांमधील मदतीला धावले. परंतु तोपर्यंत कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला होता. स्थानिकांनी तातडीने पोलिसांनी माहिती कळवली. पोलीस तातडीने रुग्णवाहिकेला घटनास्थळी घेऊन पोहोचले. कारमधील मृतदेह रुग्णवाहिकेतून शवगृहात नेले. मृतांचे नातेवाईक आल्यानंतर पोस्टमार्टम केलं जाणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार रस्त्यातून बाजूला हटवली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मृतांमध्ये २ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. इतर वाहनधारकांच्या दाव्यानुसार, कार चालकाला डुलकी लागली, त्यामुळे कार अनियंत्रित झाली. कार वेगात असल्याने चालकाला परिस्थिती हाताळता आली नाही. त्यामुळे कार थेट कंटेनरला धडकली. पोलिसांनी या अपघात प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'काही बेरोजगार युवक म्हणजे कॉक्रोच', सरन्यायाधीशांच्या विधानानं नवा वाद

मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक, लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांची कारवाई

१७ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सरकारी टोळक्यांची टोल वसूली

आरक्षणाला आव्हान, हत्येची धमकी, पिपंरी-चिंचवडमधील नगरसेवकांकडून धमकी?

धाडसी आजीचा पराक्रम! बिबट्याला घरात कोंडून नातवाचा जीव वाचवला

SCROLL FOR NEXT