आग्रा येथील संजय प्लेस भागात रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला.
आरोपींनी बलात्काराचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
आरोपींची ओळख जुनैद आणि आसिफ अशी पटली असून पोलिस शोध घेत आहेत.
पीडित मुलगी अद्याप सापडलेली नाही, पोलिस तिचा शोध घेत आहेत.
Agra gangrape case : आग्रा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी दारूच्या नशेत मुलीवर सामूहिक बलात्कार केला, हे सर्व त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. त्या प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे. घाणेरडं कृत्य करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलिस शोध घेत आहे. आग्रामधील व्यावसायिक केंद्र संजय प्लेसमध्ये आरोपींनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ माजली असून, पोलिस याप्रकरणी गंभीरपणे तपास करत आहेत. (Uttar Pradesh crime: homeless girl assaulted, accused on the run)
पीडित तरूणीने पोलिसांसमोर अद्याप कोणताही जबाब दिलेला नाही. आग्रामधील बलात्काराचे हे प्रकरण गेल्या आठवड्यातील आहे. सोमवारी याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. २४ सेकंदाच्या व्हिडिओने आग्रामध्ये खळबळ उडाली होती. व्हिडिओमध्ये बलात्कार करणाऱ्या दोन्ही तरूणाचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. तर काही तरूणांचे हसण्याचे आवज येत आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. हा व्हिडिओ संजय प्लेसमधील स्काय टॉवरमधील आहे. येथील गुफा मॉडल शॉपजवळून त्या मुलीला तरूणांनी उचलून घटानस्थळावर नेलं होतं, त्यानंतर सामूहिक बलात्कार केला, याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.
पोलिसांनी घटनास्थळाची पडताळणी केल्यानंतर संजय प्लेस चौकी प्रभारी विनोद कुमार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी सांगितले की, करबला, न्यू आग्रा येथील जुनैद आणि आसिफ या दोन तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथक कार्यरत आहेत. तसेच, पीडित किशोरीचा शोध घेण्यात येत आहे. पीडित तरूणी रस्त्यावर राहून उदरनिर्वाह करते, अशी शक्यता आहे. आरोपींनी तिला फसवून या ठिकाणी आणले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. किशोरी सापडल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि तिचा जबाब नोंदवला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.