Uttar Pradesh School Bus Accident News Saam Tv
देश विदेश

Accident News : धावत्या स्कूल बसमधून पडली, चाकाखाली चिरडून ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Uttar Pradesh School Bus Accident News : उत्तर प्रदेशमध्ये धावत्या स्कुल बसमधून पडल्याने ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू. या घटनेनंतर पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशमध्ये स्कुल बस अपघातात ९ वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

  • बसची सीट तुटल्याने मुलगी धावत्या बसमधून खाली पडली

  • मागील टायरखाली चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू

  • पोलिस तपास सुरू

Uttar Pradesh School Bus Accident 9 Year Girl Dies उत्तर प्रदेशमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे. एका खराब झालेल्या धावत्या स्कुल बसमधून पडून ९वर्षांच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव नैना असे असून ती पाहिलीत शिकत होती. बुधवारी शाळा सुटल्यानंतर ती शाळेच्या बसमध्ये बसली. ही स्कुल बस जुनी आणि खराब झालेल्या अवस्थेत होती. शाळेतील सगळी मुलं बसमध्ये बसल्यानंतर स्कुल बस सुरु झाली. अवघ्या काही क्षणातच स्कुल बसची सीट तुटल्याने नैना मागच्या मागे धावत्या बसमधून खाली पडली आणि मागून येणाऱ्या टायर खाली चिरडली गेली.

बसमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बस थांबवली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेत नैनाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

नैनाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. दरम्यान नैनाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas Cylinder: इंधनाचा प्रश्न लवकरच सुटणार? PM मोदींनी उचललं मोठं पाऊल; इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकी काय चर्चा झाली?

Besan Face Pack For Tan Removal Skin: चमकदार त्वचेसाठी लावा 'बेसन फेस पॅक', टॅनिंगही निघून जाईल

LPG cylinder shortage: गॅस सिलिंडरच्या संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT