Lucknow Varanasi Highway Acciden Saamtv
देश विदेश

UP Accident News: दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात! प्रवासी टेम्पोवर टँकर उलटला; ९ जणांचा मृत्यू

Lucknow Varanasi Highway Accident: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Pratapgarh Road Accident News: उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एका टँकर आणि प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोमध्ये हा भीषण अपघात झाला असून यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघातात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, खापलनगर ते मोहनगंज जवळ लालगंजकडून गॅसचा टँकर येत होता. तर प्रतापगडकडून एक टेम्पो जेठवाड्याकडे जात होता. यावेळी रायबरेली-जौनपूर महामार्गावर रायजू विक्रमपूरजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर आणि टेम्पोमध्ये भीषण धडक झाली. या धडकेनंतर टेम्पो पलटी झाला.

ही धडक इतकी भीषण (Accident) होती की टेम्पोमधील 16 जणांपैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी स्थानिकांनी मदत करत अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या अपघाताची माहिती मिळताच एसडीएम सदर, सीओ सिटी, सीआय लालगंज घटनास्थळी पोहोचले. टँकरमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच टॅंकरवर पाणी टाकून आग विझवण्यात आली.

मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर...

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींच्या उपचारासाठी 50 हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT