IPS TRANSFER saam tv
देश विदेश

प्रशासनात मोठा भूकंप! 12 IPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कोणत्या जिल्हयात नियुक्ती?

12 IPS Officers Transfer List 2026: उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. 2024 आणि 2025 बॅचच्या 12 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गोरखपूर, लखनऊ, वाराणसी, गाझियाबादसह विविध जिल्ह्यांत नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशमध्ये पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. 2024 आणि 2025 बॅचच्या 12 IPS अधिकाऱ्यांना सरकारकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्हे आणि पोलिस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये गोरखपूर, लखनऊ, वाराणसी आणि गाझियाबादसारख्या महत्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे पोलिस प्रशासनात महत्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत.

12 IPS अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या जिल्हयात नियुक्ती

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार अभिषेक अंजनी सिंह यांची गोरखपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य आचार्य यांना वाराणसी पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षत मंडिवाल यांची जौनपूर येथे, तर आयेद्र कुमार यांची गाझियाबाद पोलिस कमिश्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हरदोई, कानपूर देहात आणि प्रतापगडमध्येही नव्या नियुक्त्या

या बदली आदेशात के. अर्पिता यांना हरदोई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. काशिश कालरा यांची कानपूर देहात येथे बदली करण्यात आली आहे. कुणाल कुमार यांना प्रतापगड, तर कुणाल यादव यांना सहारनपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच राजेंद्र बिश्नोई यांची एटा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

लखनऊ, मथुरा आणि सीतापूरमध्येही बदल

शिवांक चौधरी यांना लखनऊचे पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. सृष्टी मिश्रा यांची मथुरा येथे, तर योगेंद्र मीना यांची सीतापूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे 2024 आणि 2025 बॅचच्या एकूण 12 IPS अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेशातील विविध जिल्हे आणि पोलिस कमिश्नरांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आता हे अधिकारी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी; ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

MP Resigns: मोदी सरकारमधील मंत्र्यानं खासदारकीचा दिला राजीनामा; काय आहे कारण?

Wedding Blouse Designs: लग्नसराईसाठी साडीवर ट्राय करा 'या' ट्रेंडी युनिक डिझाईन्स, खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Kids Health : लहान वयात मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा; मधुमेह, हृदयरोगासह गंभीर आजारांचा धोका, आजच करा 5 महत्त्वाचे बदल

Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग

SCROLL FOR NEXT