लहान वयाच्या मुलांना डेट करण्यासाठी आईने चक्क मुलीचेच ओळपत्र चोरले
लहान वयाच्या मुलांना डेट करण्यासाठी आईने चक्क मुलीचेच ओळपत्र चोरले - Saam Tv
देश विदेश

लहान वयाच्या मुलांना डेट करण्यासाठी आईने चक्क मुलीचेच ओळखपत्र चोरले

वृत्तसंस्था

मुंबई : सध्याच्या काळात कोण काय करेल याचा काहीही नेम नाही. आता हेच बघा, तरुण मुलांशी फ्लर्ट करण्यासाठी एका आईने चक्क आपल्या मुलीचे ओळखपत्र चोरले (Mother Stole College ID Card) . अमेरिकेत ही घटना घडली असून आपल्या मुलीच्या ओळखपत्राद्वारे तिला मिळणाऱ्या सर्व सुविधा उपभोगण्यासाठी तिने हे कृत्य केल्याची माहिती आहे. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण (USA Mother Stole Daughters College ID Card To Date Young Boys)-

48 वर्षीय आईकडून 22 वर्षीय मुलीच्या ओळखपत्राची चोरी

अमेरिकेतील मिसुरी (Missouri, USA) येथे राहणाऱ्या लॉरा ओग्लेस्बी (Laura Oglesby) या 48 वर्षीय आईने तिच्या 22 वर्षीय मुलगी लॉरेन हेजचे (Lauren Hays) ओळखपत्र चोरले. याचं कारण म्हणजे लॉराला त्या ओळखपत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांचा उपभोग घ्यायचा होता. त्यातील मुख्य लाभ म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांना डेट करणे. तिने 2016 पासून ही फसवणूक करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ती 43 वर्षांची होती. त्या काळात लॉरा अर्कान्सासमध्ये राहत होती.

हे देखिल पहा-

मुलीची ओळख चोरुन बनवले बॉयफ्रेंड

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, लॉराला तिच्या मुलीचे ओळखपत्र मेलद्वारे प्राप्त झाले होते. त्याचा वापर करुन तिने मिसुरीचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवले. त्यानंतर ती मिसुरीमधील माउंटन व्ह्यू या छोट्याशा शहरात राहायला गेली, जिथे तिने तिच्या मुलीचे नाव आणि तिचे वय वापरायला सुरुवात केली. म्हणजेच ओळखपत्राच्या माध्यमातून ती लॉरेन हेज बनली.

यादरम्यान तिने असे दाखवले की ती साऊथ वेस्ट बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे जी एका लायब्ररीत काम करते. यादरम्यान या महिलेने अनेक तरुणांना बॉयफ्रेंड बनवले. त्यांना असं वाटत होतं की ती 22 वर्षांची आहे, अशी माहिती मिसुरीमधील वेस्टर्न डिस्ट्रिक्टसाठी यूएस अॅटर्नी ऑफिसने दिली.

मुलीच्या नावावर लाखोंचे कर्ज घेतले

मिसुरी शहरातील एका जोडप्याने या महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगीही दिली. या जोडप्याने पोलिसांना सांगितले की, ही महिला स्वत:चे वय 22 वर्षे सांगायची आणि 17 वर्षांच्या मुलीसारखी अल्लडपणे वागायची. ती स्वतःला एक साधी, मूर्ख मुलगी म्हणून दाखवत असे, जेणेकरून प्रत्येकाला ती आवडेल आणि तिचे म्हणणे स्वीकारेल.

या महिलेने आपल्या मुलीच्या नावावर जवळपास 19 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आता तिला अटक करण्यात आली आहे. तिला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, तिला विद्यापीठासह तिच्या मुलीला नुकसान भरपाई म्हणून 13 लाख रुपयांहून अधिक द्यावे लागतील.

Edited By - Noopur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT