School Firing x
देश विदेश

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

School Firing In USA : अमेरिकेच्या मिसिसिपीतील एका शहरातील एका शाळेत गोळीबार झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.

Yash Shirke

  • अमेरिकेतील शाळेत अंदाधुंद गोळीबार

  • चौघांचा गोळीबारात मृत्यू, १२ जण जखमी

  • मृत आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Firing : अमेरिकेतील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून याव्यतिरिक्त १२ हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना अमेरिकेच्या मिसिसिपीतील एका हायस्कूलमध्ये घडल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिसिसिपीतील लेलँड येथील एका हायस्कूलमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात चौघांचा मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांना हेलिकॉप्टरने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. महापौर जॉन ली यांनी या घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगताना मृतांची आणि जखमींची संख्या वाढू शकते असे म्हटले आहे.

सीबीएसच्या वृत्तानुसार, हायस्कूलमध्ये गोळीबार मध्यरात्रीच्या सुमारास झाला. गोळीबारामध्ये चौघेजण ठार झाले आणि डझनभराहून अधिक जण जखमी झाले. गोळीबारात २० पेक्षा जास्त लोकांना गोळ्या लागल्या. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, तसेच संशयिताची ओळखही पटलेली नाही, अशी माहिती मिसिसिपीचे सिनेटक डेरिक सिमन्स यांनी सांगितले आहे.

या गोळीबारात प्रकरणाच्या तपासात मिसिसिपी ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एमबीआय) ही लेलँड पोलिसांना मदत करणार आहे. वॉशिंग्टन काउंटीमधील मिसिसिपीतील लेलँड या शहरात ही गोळीबाराची घटना घडली. मृतांच्या, जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते असे मिसिसिपी पोलिस विभागाच्या (एमडीपीएस) प्रवक्त्या बेली मार्टिन यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Director Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT