मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे वारे वाहू लागलेत...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धाची धमकी दिल्यानंतर आता दोन्ही देशांमधील तणाव निर्णायक वळणावर पोहचलाय...अमेरिकेनं इराणमधील हल्ल्यासाठी एक सीक्रेट लिस्ट तयार केलीय.. त्यामुळे अमेरिका इराणमधील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करणार हे उघड झालयं...
अमेरिकेचे 'टार्गेट' काय?
अमेरिकेच्या रडारवर फोर्डो, नतांज आणि इस्फहानमधील अणुकेंद्र तसंच
इराणमधील लष्करी तळ आणि स्ट्रॅटेजिक तळ रडारवर आहेत.
त्याचबरोबर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र केंद्र आणि हवाई संरक्षण यंत्रणेवर अमेरिकेचे लक्ष राहणार असून
इराणमधील हमास, हिजबुल्लाह या सारख्या संघटनेंचे तळही अमेरिकेच्या टार्गेटवर असतील.
इराणमधील हल्ल्यासाठी जी ठिकाणं रडारवर आहेत त्याची ही सीक्रेट लिस्ट
ब्रिटन
फ्रान्स
इस्रायल
संयुक्त अरब अमिराती
जॉर्डन
सौदी अरेबिया
या इराणच्या शत्रूराष्ट्रांसोबतही शेअर केलीय...
अमेरिकेने 'यूएसएस अब्राहम लिंकन' ही युद्धनौका आधीच मध्यपूर्वेत तैनात केलीय.. तर इराणनेही शांत न बसण्याचा इशारा अमेरिकेला दिलाय... त्यामुळे ट्रम्प यांची धमकी दबावतंत्राचा वापर करून इराणमधील राजवट उद्धवस्त करण्यासाठी आहे की अणुकार्यक्रम रोखण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.