US Presidential Election Saam Digital
देश विदेश

US Presidential Election : कशी होते अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक? भारत आणि अमेरिकेच्या लोकशाहीत काय आहे फरक? वाचा सविस्तर

US Election : अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकांची धामधूम आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यामुळे रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प याच्याविरोधात कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकांची धामधूम आहे. डेमोक्रॅटीक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्यामुळे रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प याच्याविरोधात कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचा शिकागो येथे मेळावा पार पडला. यात कमला हॅरिस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. दरम्यान जगातील अनेक देशांच्या निवडणुकीत अनेक पक्ष भाग घेतात, भारतातही तीच पद्धत आहे. अमेरिकेच्या राजकारणात मात्र दोनच पक्षांचा दबदबा असतो आणि या दोन पक्षांपैकी एका पक्षाचा उमदेवार अध्यक्ष बनतो.

भारतात लोकशाही पद्धत आहे आणि लोकांमधून खासदार निवडले जातात. ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतो. अमेरिकेतही लोकशाही आहे, मात्र अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे. तिथे राष्ट्राध्यक्ष थेट जनतेतून निवडले जातात. मात्र प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक मतं मिळणारा उमेदवार विजयी होईल असं नाही. इलेक्टोरल कॉलेज मंतांना खूप महत्त्व आहे आणि ही मतं मिळवण्यासाठीही सर्वाधिक चुरस असते.

निवडणुकीची तयारी आणि प्रक्रिया कशी असते?

युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी घेतली जाते.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी एक वर्ष याची प्रक्रिया सुरू होते. अमेरिकेत डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. या पक्षांचे उमेदवार निवडणूक प्रचार सुरू करतात.

विविध पक्षांचे अनेक उमेदवार या प्रचारात सहभागी होतात आणि निवडणूक निधी गोळा करण्यासाठी रॅली काढली जाते.

डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षांकडून निवड उमेदवारांमध्ये चर्चा आयोजित केल्या जातात. प्रत्येक उमेदवार त्यांची धोरणं आणि इतर मुद्दे प्रखरपणे मांडतो.

सर्व प्रथम प्राइमरी आणि कॉकस हे असे दोन टप्पे आहेत. यामध्ये लोक राष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवडण्यासाठी राज्य आणि राजकीय पक्षांना मदत करतात. या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे.

कॉकस

कॉकस हा एक असा टप्पा आहे, ज्यामध्ये पक्षाचे सदस्य चर्चेनंतर मतदान करतात आणि सर्वोत्तम उमेदवार निवडतात. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र उमेदवार निवडले जातात. प्रतिनिधी निवडण्यासाठी राजकीय पक्षाच्या स्थानिक सदस्यांची ही बैठक असते. कॉकसमध्ये प्रतिनिधी निवडले जातात.

Presidential Primary Caucus

प्राइमरी Caucus मध्ये लोक राष्ट्रपती निवडणुकीच्या 6 ते 9 महिन्यांच्या आत त्यांचा उमेदवार निवडतात. यामध्ये विविध पक्षांचे विविध प्रतिनिधी सर्वोत्कृष्ट उमेदवाराला मतदान करतात. हा उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. बहुतेक राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुका होतात. प्राथमिक मतदार गुप्त मतदानाद्वारे त्यांच्या आवडत्या उमेदवाराची निवड करतात. आयोवा, न्यू हॅम्पशायर, नेवाडा आणि दक्षिण कॅरोलिनाच्या निकालांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जातं. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल हे या प्रदेशांच्या निकालांवर अवलंबून असतं.

प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते, तेव्हा लोक मतदान करतात, मात्र हे मतदान एका अशा ग्रुपला दिलं जातं, त्याला इलेक्टर म्हटलं जातं. अध्यक्षपदासाठी उभे असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा स्वतःच्या मतदारांचा गट असतो (स्लेट). जेव्हा लोक राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मत देतात, तेव्हा ते प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवाराचा आवडता इलेक्टर निवडत असतात.

इलेक्टोरल कॉलेज व्होट्स म्हणजे काय?

भारतात प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ठराविक जागा असतात. निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना निवडून दिलं जातं. मात्र अमेरिकेत प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत, जी अध्यक्षीय निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ही मतं मिळवण्यासाठी अमेरिकेत जास्त चुरस पाहायला मिळते. संपूर्ण अमेरिकेत 538 इलेक्टोरल व्होट्स आहेत. यापैकी 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळणारा उमेदवार विजयी ठरतो. अमेरिकेची दोन राज्य वगळतात सर्व राज्यांसाठी हा नियम लागू होतो. एखाद्या राज्यातील मतदारांनी आवडत्या उमेदवाराला मतदान केलं तरी ते राज्यपातळीवर ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्या उमेदवाराच्या खात्यात त्या राज्याची इलेक्टोरल व्होट्स जमा होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT