Us Presidential Election Saam Digital
देश विदेश

US Presidential Election : भारतीय वंशाची महिलाच असणार US अध्यक्षपदाची उमेदवार? माजी राष्ट्राध्यक्षांचाही मिळाला पाठिंबा

Us Presidential Election Update/Kamala Harris : अमेरिकेच्या अध्यक्षपादाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी पाठिंबा दिला आहे.

Sandeep Gawade

जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ऐन निवडणुकीत या मोठ्या घडामोडी घडल्यामुळे घडल्यामुळे डेमोक्रटीक पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांच्या नाव जवळापास निश्चित झालं आहे. शुक्रवारी अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे नेते बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. ओबामा यांच्या उघड समर्थनानंतर आता हॅरिस रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कडवी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबामा आणि मिशेल यांनी हॅरिस यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ संदेशही जारी केला आहे. यात त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आम्ही कमला हॅरिस यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की, त्या अमेरिकेच्या महान राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ओबामा आणि मिशेल यांनी पाठिंबा दिल्यानंतर कमला हॅरिस यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दोघांचे आभार मानले आहेत.

अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतीच अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर त्यांनीच कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा आपला निर्णय देशाला एकत्र आणणे आणि नवीन पिढीवर जबाबदारी सोपवण्याचा उद्देश असल्याचं म्हटलं आहे.

जो बिडेन यांनी बुधवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हणाले की, अमेरिकेची लोकशाही वाचवण्यासाठी 2024 च्या निवडणुकीतून माघार घेत आहे. यामागे नव्या पिढीकडे जबाबदारी समोवणे हा उद्देश आहे. हा देखील आपल्या देशाला एकत्र आणण्याचा एक मार्ग आहे.मी राष्ट्रपतीपदाचा आदर करतो, पण देशावर जास्त प्रेम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT