Vivek Ramaswamy
Vivek Ramaswamy  saam Tv
देश विदेश

US Presidential Election: मी हिंदू आहे...अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेला मूळ भारतीय वंशाचा हा तरूण नेता कोण?

Bharat Bhaskar Jadhav

US Presidential Election candidate Vivek Ramaswamy:

''मी हिंदू आहे. मला शिकवले गेले आहे की, देवाने आपल्या सर्वांना येथे एका उद्देशाने पाठवले आहे. धर्म बदलणारा मी खोटा हिंदू नाही. माझ्या राजकीय कारकिर्दीसाठी मी खोटे बोलू शकत नाही'', हे विधान कोणी भारतीय किंवा भाजप किंवा साधूचे नाहीत. हे विधान आहे अमेरिका राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील उमेदवाराचे. त्यांचे नाव नेहमी अशा काही विधानामुळे चर्चेत असते. कधी हिंदू देव-देवतांवर तर कधी पंतप्रधान मोदींची स्तृती केल्याने ते चर्चेत असतात. हो, आपण सध्या चर्चा करत आहोत, रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार विवेक रामास्वामींची. (Latest News)

विवेक रामास्वामी हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. रामास्वामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक लढवत आहेत. रामास्वामी आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजही ते आपल्या विधानमुळे चर्चेत आहेत. विवेक रामास्वामी (Vivek Ramaswamy) आयोवामधील CNN टाउन हॉलला संबोधित करत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) गिनी मिशेल यांनी रामास्वामी यांना हिंदू धर्मावरून (Hindu Religion) प्रश्न केला होता. तुम्ही एक हिंदू राष्ट्राध्यक्ष अमेरिका कसा चालवू शकता. अनेकांना वाटतं की, तुम्ही अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. कारण तुम्ही अमेरिकेतील त्या धर्माला मानत नाहीत, ज्या धर्मावर आमच्या पूर्वजांनी अमेरिकेची स्थापना केली. असा मिशेल यांनी प्रश्न केला.

यावर उत्तर देताना रामास्वामी म्हणाले की, मला हे मान्य नाही. माझा विश्वास आहे की, आपण सर्व समान आहोत. कारण देव आपल्या सर्वांमध्ये आहे. ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी मी सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. धर्म प्रचाराचे काम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे नाही. पण ज्या मूल्यांवर अमेरिकेची स्थापना झाली त्या मूल्यांचे मी निश्चितपणे पालन करेन. त्यांच्या उत्तराने टाउन हॉलमधील जनता भारावून गेली. पण त्यांच्या या विधानामुळे रामास्वामी याची पुन्हा एकदा चर्चा भारतात होत आहे.

रामास्वामी कोण आहेत? असे सर्च केले जात आहेत. विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे आहेत. ते रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन नेते आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत. रामास्वामी यांचे वय ३८ वर्ष आहे. रामास्वामी यांचा जन्म ओहिया येथे झालाय. रामास्वामी यांचे आई-वडील भारतातून स्थलांतरित झाले होते. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवलीय. त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले आहे.

रामास्वामी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून काम करत होते. येलमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी रामास्वामी यांनी भरपूर पैसा कमावलाय. रामास्वामी यांनी २०१४ मध्ये स्वतःची बायोटेक कंपनी, Roivant Sciences (ROIV.O) ची स्थापना केली. या कंपनीने पूर्णपणे विकसित न झालेल्या औषधांच्या मोठ्या कंपन्यांकडून पेटंट विकत घेतलंय. त्यांनी २०२१ मध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला. परंतु २०२३ पर्यंत ते अध्यक्ष राहिले. २०२२ मध्ये रामास्वामी यांनी स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटची सह-स्थापक होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये रामास्वामी यांनी राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान मोदींनी १० वर्षे देशाला फसवलं; नाशकातून उद्धव ठाकरेंनी मोदींवर डागली टीकेची तोफ

Beed Crime News | घरावर हल्ला! कारण काय तर "भाजपला मतदान केलं म्हणून..."

Narendra Modi Speech Nashik | मोदींच्या सभेत शेतकऱ्याची घोषणाबाजी, व्हिडीओ व्हायरल

Haircare Routine: केस गळती कमी करण्यासाठी झोपण्यापुर्वी 'हे' उपाय करा

PM Modi Road Show: PM मोदींचा मुंबईत भव्य रोड शो, पाहावं तिथे गर्दीच गर्दी! VIDEO

SCROLL FOR NEXT