अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूरअम जगाचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. सध्या मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीचे ट्रेंड झपाट्याने बदलत आहेत. या मतमोजणीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी २१४ इलेक्टोरल मतांचा आघाडी मिळवली आहे. तर डेमोक्रॅटच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस १७९ मतांनी आघाडीवर आहेत. कोणत्या राज्यात कोण विजयी झाले आहे हे आपण पाहणार आहोत...
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार असून सध्या मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ७ स्विंग राज्यांमध्ये कमला हॅरीस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. या ७ राज्यांमध्ये ऍरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. कमला हॅरिस थोडीशी आघाडी कायम ठेवत असल्याचे एक्झिट पोल दाखवतात.
अमेरिकेत ५० राज्ये आहेत आणि त्यापैकी बहुतेक स्विंग राज्ये वगळता प्रत्येक निवडणुकीत एकाच पक्षाला मतदान करत आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदारांचा कल बदलत राहतो. ऍरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिनमध्ये एकूण ९३ इलेक्टोरल मते आहेत. राष्ट्रपती होण्यासाठी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. २७० इलेक्टोरल मतं मिळवणाऱ्या कोणत्याही उमेदवारासाठी ही सात राज्ये महत्त्वाची आहेत. ज्या उमेदवाराला २७० किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळतील तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल.
टेक्सास
ओहियो
वायोमिंग
लुझियाना
दक्षिण डकोटा
उत्तर डकोटा
नेब्रास्का
आर्कान्सास
फ्लोरिडा
इंडियाना
वेस्ट व्हर्जिनिया
केंटकी
दक्षिण कॅरोलिना
टेनेसी
ओक्लाहोमा
अलाबामा
मिसिसिपी
न्यूयॉर्क
इलिनॉय
डेलावेअर
न्यूजर्सी
व्हरमाँट
मेरीलँड
कनेक्टिकट
मॅसॅच्युसेट्स
रोड आयलंड
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.