US President Election Result  Saam Tv
देश विदेश

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Donald Trump Vs Kamala Harris: डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Priya More

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार असून याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

सध्याच्या ट्रेंडनुसार ट्रम्प यांना १९८ इलेक्टोरल मते मिळाली होती आणि कमला यांना ९९ मते मिळाली होती. राष्ट्रपती होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते. जॉर्जिया, ऍरिझोना, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलिना आणि नेवाडा या स्विंग राज्यांच्या निकालांवर ट्रम्प आणि कमला यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे ठरणार आहे.

फ्लोरिडा विद्यापीठाच्या 'इलेक्शन लॅब'नुसार, ७८ दशलक्षाहून अधिक अमेरिकन लोकांनी आधीच मतदान केले आहे. इथे काही जण डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असे म्हणतात. तर कुणी कमला हॅरिस यांचा विजय होईल असे म्हणत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये कोण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार याचे चित्र स्पष्ट होईल. यावेळी कोणताही अडथळा न येता निकाल लागतील, असा विश्वास आहे. कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला विजयाबद्दल खात्री आहे.

सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता असते. पण अनेक वेळा असे होत नाही. प्रत्यक्षात काय होते की अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी मतमोजणी सुरू होते. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत आहे. इलेक्टोरल कॉलेज मते राज्यांना लोकसंख्येच्या आधारावर दिली जातात. एकूण ५३८ इलेक्टोरल कॉलेजच्या मतांसाठी मतदान होत आहे. ज्या उमेदवाराला २७० किंवा त्याहून अधिक इलेक्टोरल कॉलेज मते मिळतात त्या उमेदवाराला निवडणुकीतील विजयी घोषित केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

SCROLL FOR NEXT