PM Modi Japan Visit
PM Modi Japan Visit Saam Tv
देश विदेश

PM Modi Japan Visit: 'अमेरिकेतसुद्धा तुमची हवा, मला ऑटोग्राफ द्याना', PM मोदींची लोकप्रियता पाहून बायडेन यांंनी घातली गळ

Shivani Tichkule

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. जपानच्या हिरोशिमा शहरामध्ये जी-7 शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पीएम मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेतली. यावेळी जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना चक्क त्यांचा ऑटोग्राफ मागितला. (Latest Marathi News)

जपानच्या हिरोशिमामध्ये आंतरराष्ट्रीय जी-7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये अनेक देशांचे राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकिचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सहभागी झाले आहेत.

जपानमध्ये होत असलेल्या G-7 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्याची लोकप्रियता 78 टक्के इतकी आहे. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nareandra Modi) यांची लोकप्रियता कायम आहे.

पंतप्रधानांना फॉलो करणाऱ्यांच्या यादीत जगातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्याच वेळी, शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी क्वॉड बैठकीत पंतप्रधान मोदींना चक्क त्यांचा ऑटोग्राफ मागितला. इतकेच नव्हे त्यांनी सर्वांचे मनं जिंकणारे विधानदेखील केलं आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. पीएम मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाता यावे यासाठी देशातील प्रमुख नागरिकांकडून विनंत्यावर विनंत्या येत आहे. मात्र या सर्वांना कार्यक्रमात कसं सहभागी करून घ्यायचं हा आमच्या पुढे प्रश्न आहे असं बायडन म्हणाले.

'तुम्ही अमेरिकन लोकांवरही प्रभाव टाकला आहे. तुमची अमेरिकेत प्रचंड लोकप्रियता आहे. तुम्ही प्लीज मला तुमचा ऑटोग्राफ द्या, असं बायडन म्हणाले. हिरोशिमामधील या घटनेची सध्या जागतिक पातळीवर चर्चा होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

Akola News : शिक्षकाचा शॉक लागून मृत्‍यू; शेतात भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना

Saleel Kulkarni : "एकच चष्मा लावून सगळे चित्रपट किंवा माणसं बघता येत नाही"; सलील कुलकर्णीची ‘नाच गं घुमा’बद्दलची पोस्ट चर्चेत

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर काही तासांतच दोन मोठे अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, ९ जखमी

Karnataka Crime : ६ वर्षांच्या पोटच्या पोरासाठी आईच बनली काळ; नवऱ्यासोबत भांडणानंतर मगरीच्या कळपात फेकलं

SCROLL FOR NEXT