US President Donald Trump’s statement exposes Pakistan’s nuclear war preparations against India. saam tv
देश विदेश

पाकिस्तानची भारताविरोधात अणू युद्धाची तयारी? ट्रम्पच्या गौप्यस्फोटामुळे पाकची पोलखोल

Pakistan’s Nuclear Plan: पाकिस्तान भारताविरोधात अणु युद्धाची तयारी करतोय. स्वत: ट्रम्प यांनी चाचण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. ट्रम्प नेमकं काय म्हणाले? पाकिस्तानसह कोणते देश अण्वस्त्र चाचण्या करतायत ? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नापाक मनसुबेच जगासमोर मांडलेत.

  • पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता.

  • पाकिस्तानची अणवस्त्र चाचणी भारतासाठी धोक्याची घंटा

पाकिस्तानाचे नापाक इरादे कधीच लपून राहिलेले नाहीत.आता पाकिस्तानची मोठी पोलखोल खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीय.अमेरिका वगळता रशिया, चीन, उत्तर कोरिया सारखे अनेक देश अण्वस्त्रांची चाचणी करच असल्याचं अनेकदा समोर आलंय. मात्र आता ट्रम्प यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानं पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. नेमकं ट्रम्प काय म्हणाले त्यांच्याच तोंडून ऐकूयात.

मुळात रशियाच्या नव्या अणवस्त्रांच्या चाचणीनंतर 30 वर्षांनी अमेरिकेच्या अण्वस्त्र परीक्षणाच्या निर्णयाबद्दल ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं. त्यावेळी उत्तर देताना बोलता, बोलता ट्रम्प यांनी पाकिस्तानचे नापाक मनसुबेच जगासमोर मांडलेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती अण्वस्त्र संघर्षापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे आणि भारताच्या सहिष्णू धोरणामुळे पाकला अभय देण्यात आला. मात्र पाकिस्तानची अणवस्त्र चाचणी भारतासाठी धोक्याची घंटा आहे.

भारतानं 1998 पासून अद्याप कोणतीही अण्वस्त्र चाचणी केलेली नाही. 1998 मध्ये भारतानं पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती. आता चीन आणि पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्या करत असल्यानं भारतासाठी पोखरण- 3 ची संधी खुली झालीय. आता भारत नेमका काय निर्णय घेतो. गुप्तपणे सुरु असणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यांना रोखण्यासाठी ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात? याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT