US Strikes Venezuela: Saam TV
देश विदेश

US Strikes Venezuela: व्हेनेझुएलावर अमेरिकेचा एअर स्ट्राईक, ४० जणांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्ष मादुरोंना पत्नीसह बेड्या

Donald Trump On Venezuela: व्हेनेझुएला देशावर हल्ला करत अमेरिकेने त्यावर ताबा मिळवला. या हल्ल्यात ४० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सैन्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना बायकोसह अटक केली.

Priya More

Summary -

  • अमेरिकेचा व्हेनेझुएलावर मोठा हवाई हल्ला

  • कराकसमध्ये एअर स्ट्राईकमध्ये ४० जणांचा मृत्यू

  • राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरोंना पत्नीसह अटक

  • १५० हून अधिक लढाऊ विमानांचा हल्ल्यात वापर

अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत ताबा मिळवला. व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात जवळपास ४० जणांचा मृत्यू झाला. व्हेनेझुएलाच्या एका अधिकाऱ्याने द न्यूयॉर्क टाईम्सला याबाबत माहिती दिली. अमेरिकेकडून ऑपरेशन अ‍ॅब्सोल्युट रिझॉल्व्ह नावाने हा हवाई हल्ला ३ जानेवारीला करण्यात आला. या हल्ल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली.

व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, व्हेनेझुएलावर अमेरिकेने ताबा मिळवला आहे. जोपर्यंत त्याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत व्हेनेझुएलाला अमेरिकाच चालवेल. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैनिकांचे कौतुक केले आणि सांगितले की, असे धाडस जगातील कोणताच देश करू शकत नाही. मादुरो यांना अटक करण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये १५० पेक्षा जास्त लढाऊ विमानाचा समावेश करण्यात आला होता.

अमेरिकेने मध्यरात्री २ वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता व्हेनेझुएलाच्या ४ शहरांवर एकाच वेळी हल्ला केला. त्यावेळी राष्ट्रपती निकोलस मादुरो हे एका मिलिट्री बेसमध्ये झोपले होते. अमेरिकेच्या सैनिकांनी मादुरो आणि त्यांच्या बायकोला बेडरूममधून ओढत बाहेर काढले आणि त्यांना ताब्यात घेतले. मादुरो आणि त्यांची बायको सिलिया एडेला या दोघांना अटक करत अमेरिकेचे सैनिक न्यूयॉर्कला घेऊन आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची बायको सिलिया अडेला फ्लोरेस यांना अमेरिकन सैन्यांनी अटक केली असून त्यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आले आहे. अमेरिकेकडून अटक होण्यापूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी या हल्ल्याचे आम्ही अमेरिकेला सडेतोड उत्तर देऊ असे सांगितले होते. तसंच त्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा देखील केली होती.

व्हेनेझुएलावरील हल्ल्याची ३ प्रमुख कारणे -

- अमेरिकेचे असे म्हणणे आहे की व्हेनेझुएलाचे सरकार आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका बनत आहे आणि तिथून अमेरिकेविरुद्ध कट रचले जात आहेत.

- ट्रम्प यांनी आरोप केला की, व्हेनेझुएला हा त्यांच्या देशात कोकेन आणि फेंटानिल सारख्या धोकादायक ड्रग्जची तस्करी करण्याचा एक प्रमुख मार्ग बनला आहे. हे संपवण्यासाठी, मादुरोला सत्तेवरून काढून टाकणे आवश्यक आहे.

- ट्रम्प यांनी असाही आरोप केला की, मादुरोच्या धोरणांमुळे लाखो व्हेनेझुएलातील नागरिकांना देश सोडून जावे लागले. तसंच तुरुंग आणि मानसिक रुग्णालयांमधून गुन्हेगारांना हद्दपार करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Health: सतत थकवा जाणवतोय? लो ब्लड प्रेशर तर नाही ना, वाचा प्रमुख लक्षणे, पाहा तज्ज्ञ काय सांगतात

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून १० टक्के पाणी कपात; या भागांना बसणार फटका

Maharashtra politics : पुन्हा भूकंप होणार? शिंदेंची शिवसेना फुटणार? खासदाराच्या त्या दाव्याने राजकारणात खळबळ

Saree With Matching Mangalsutra Design: कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र उठून दिसेल? हे आहेत लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 पॅटर्न

Homemade Paneer : बाजारात मिळणारे पनीर बनवा आता घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT