US–Iran Conflict  Saam tv
देश विदेश

इस्त्रायल-इराणच्या युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; हजारो टन माल पडून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान

US–Iran Conflict : इस्त्रायल-इराणच्या युद्धाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा हजारो टन माल पडून आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे

भारतीय फळभाज्यांच्या निर्यातीवर

हजारो टन माल निर्यात न झाल्याने पडून

कोट्यावधी रुपयांचे नुकसान

पुणे : अमेरिका–इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय निर्यात वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा थेट फटका भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून भारतातून निर्यात होणारा फळ आणि पालेभाज्या हा जागेवरच थांबून आहेत. विमान सेवा बंद असल्याने माल पाठवता येईना झाला नाही. तर सागरी मार्गावरही अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर यामुळे हजारो टन निर्यात मामी बंदरावर पडून आहे.

आंतरराष्ट्रीय तणावामुळे हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झालीये. ताजी फळे आणि भाजीपाल्याची निर्यात सध्या अशक्य झालीये. त्यात समुद्री मार्ग ही बंद ठेवण्यात आला आहे. त्यात संघर्ष वाढल्यास जहाज वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेषतः वेळेवर पोहोचणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालासाठी धोका मानला जातोय. युद्धामुळे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे . केंद्र सरकारने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निर्यातदाराकडून केली जात आहे.

निर्यात होणाऱ्या पालेभाज्या कोणत्या?

कांदा, भेंडी, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, शेवग्याच्या शेंगा, गाजर

निर्यात होणारी फळे पाहा?

आंबा, द्राक्ष. डाळिंब,अंजीर, पेरू, संत्री

महत्वाचे म्हणजे रमजान ईदमुळे फळे मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. भारतातून मात्र आता ऑर्डर घेऊन व्यापारी आता अडचणीत आले आहेत . त्यात भारतीय निर्यातदारांना सांगण्यात आलं आहे. संपूर्ण वाहतूक ही 94 टक्के बंद करण्यात आलीय. अचानक बंद केल्याने मोठा आर्थिक फटकळ बसणार आहे, यांची मोठी मागणी आखाती देशांमध्ये असते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे हे फळे आणि पालेभाज्या आता देशाबाहेर निर्यात न होऊ शकल्याने मोठे नुकसान होत आहे.

हवाई आणि सागरी मार्ग बंद असल्याने आखाती देशांकडे जाणारी पालेभाज्या व फळांची निर्यात सध्या थांबली आहे. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. आता सरकारकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026 : भारतीय महिला कबड्डी संघानं इतिहास रचला; एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर कोरलं नाव, ईराणला नमवलं

Maharashtra News Live Update: पंढरपुरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Gyanesh kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत ठाकरेंचं वादळ; ४ ऑक्टोबरला शिवसेना-मनसेचा महामोर्चा

Hair Care: हेअर फॉल होईल कमी, फक्त ३ आठवडे कांद्याचा रस लावून पाहा, केस होतील मजबूत आणि घनदाट

२६५ तालुक्यात दुष्काळ, पंचनाम्याला सुरूवात; देवेंद्र फडणवीसांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT